scorecardresearch

गणेश चतुर्थी २०२०

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती फक्त पुणेच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राचं श्रद्धेचं स्थान आहे. पुण्यातील बुधवार पेठेतील छत्रपती शिवाजी महाराज रोडवर असलेलं श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं मंदिर हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. नवसाला पावणारा आणि मनोकामना पूर्ण करणारा गणपती म्हणून त्याची ख्याती आहे. या मंडळाची स्थापना १८९३ साली झाली. १८९३ मध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांनी मुर्तीची स्थापना केली. १९६८ साली ‘दगडूशेठ गणपती’ची मूर्ती मंडळाने तयार करून घेतली. प्रसिद्ध शिल्पकार, मूर्तिकार आणि यंत्रविज्ञेचे अभ्यासक शंकरअप्पा शिल्पी यांच्या कल्पनेतून ही मूर्ती पूर्ण झाली. मूर्तिकार नागेश शिल्पी यांचेही या कामात योगदान होते.

अन्य विडिओ

ताज्या बातम्या