मुलगी जन्माला आल्यावर नाक मुरडणारे लोक समाजात दिसत असताना कोल्हापुरात कन्या जन्माचा आनंद आगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. पाचगाव येथील गिरीश पाटील कुटुंबीयांनी ढोल ताशाच्या गजरात हत्तीवरून मिरवणूक काढून कन्या इरा हिच्या जन्माचे आज जल्लोषी स्वागत केले. वंशाला दिवा हवा तो मुलाच्या रूपाने अशी मानसिकता समाजात एका वर्गात दिसते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> कोल्हापूर: तुरबत नासधूस प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी पन्हाळा बंदला प्रतिसाद; पर्यटन थंडावले

अलीकडे त्यामध्ये बदल होत असला तरी ही प्रवृत्ती पूर्णतः बदललेली नाही. तर दुसरीकडे मुलगी जन्माला आले की तिचे स्वागत केले जात आहे. कोल्हापूर लगत असलेल्या पाचगाव येथील पाटील कुटुंबीयांनी असेच आपल्या घरातील कन्येचे वाजत गाजत स्वागत केले. पुणे येथे आयटी क्षेत्रामध्ये सेवा करत असलेली गिरीश पाटील – सुधा यांना पहिली मुलगी जन्माला आली. २५ वर्षे घरात मुलगी नसल्याने ती जन्माला येण्याचा आनंद काही वेगळाच होता. तिचे इरा हे नाव ठेवण्यात आले. कन्या जन्माचे जंगी स्वागत करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. ढोल ताशाचा गजर, सजवलेला रथ, सुशोभित हत्ती यावरून इराची मिरवणूक काढण्यात आली. नातेवाईक, शेजारी यांना निमंत्रित करून जोरदार स्वागत समारंभ करण्यात आला. मुलीच्या जन्माचे असे वेगळ्या पद्धतीने स्वागत केल्याने त्याचे समाजातून स्वागत करण्यात येत आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man celebrate birth of girl child by taking out a procession on elephant in kolhapur zws