शेतजमीनीवर काढलेल्या बँकेच्या कर्जाचा तारण दस्त फेरफार मध्ये नोंद करणेसाठी वीस हजार रुपयाची लाच स्वीकारल्या प्रकरणी तलाठी व त्याचा खाजगी सहाय्य यांना आज येथे रंगेहाथ पकडण्यात आले.
तलाठी सर्जेराव शामराव घोसरवाडे, (वय ४१, रा.पुईखडी,नवीन वाशी नाका जवळ, कोल्हापूर, मूळ रा.कांडगाव) व खाजगी व्यक्ती साहिल यासीन फरास (वय- 23, रा. साजणी, ता.हातकणंगले) अशी त्यांची नावे आहेत.
५९ वर्षीय तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या जमीनीचा दस्त फेरफार मध्ये नोंद करणेकामी तसेच तक्रारदाराच्या वडिलांनी त्यांच्या नावावर असलेल्या शेतजमीनीवर काढलेल्या बँकेच्या कर्जाचा तारण दस्त फेरफार मध्ये नोंद करणेसाठी
साजणी येथील तलाठी घोसारवाडे याने २० हजार रुपयाची लाच मागणी करून ती रक्कम फरास यास स्वीकारण्यास सांगितली. तक्रारदार याच्याकडन फरास याने लाच स्वीकारल्याने त्यास रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर आरोपी घोसारवाडे यास देखील पकडुन ताब्यात घेवून दोन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे,अशी माहिती सापळा पथक सरदार नाळे,पोलीस उपअधीक्षक यांनी दिली.