भारताच्या सुशील कुमारने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे. ७४ किलो वजनी गटात सुशील कुमारने आपला दक्षिण आफ्रिकन प्रतिस्पर्धी सुशील कुमारवर अवघ्या १ मिनीट २० सेकंदात मात करत सुवर्णपदकावर मोहोर उमटवलं. सुशीलच्या कामगिरीने कुस्तीत भारताने आतापर्यंत ४ पदक मिळवलं आहे. याचसोबत २९ पदकांसह भारताने पदकतालिकेत आपलं स्थान अजुन भक्कम केलं आहे. राहुल आवारेपाठोपाठ सुशील कुमारनेही कुस्तीत भारताला सुवर्णपदकाची कमाई करुन दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

….सविस्तर वृत्त लवकरच

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cwg games 2018 sushil kumar bags another gold in 74 kg heavyweight category at gold cost commonwealth games