कर्णधार हेन्री डेव्हिड्स (६४) आणि जॅक्स रूडोल्फ (नाबाद ४९) यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर टायटन्सने चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेतील ‘ब’ गटात सनरायजर्स हैदराबादविरुद्ध आठ विकेट राखून विजयाची नोंद केली. त्यामुळे सनरायजर्सला स्पध्रेतील आव्हान टिकवणे कठीण जाणार आहे.
सनरायजर्सची १४५ या धावसंख्येचे आव्हान दक्षिण आफ्रिकेच्या टायटन्सने दोन फलंदाजांच्या मोबदल्यात १६.३ षटकांत आरामात पेलले. डेव्हिड्स आणि रूडोल्फ या जोडीने धडाकेबाज फलंदाजीचा प्रत्यय घडविताना १२.१ षटकांत ११२ धावांची भागीदारी रचली. डेव्हिडने सलग दुसऱ्या अर्धशतकाची नोंद करताना ४२ चेंडूंत ७ चौकार आणि ४ षटकारांसह आपली खेळी साकारली. ३ चौकार आणि २ चौकारांसह खेळी करणाऱ्या रूडोल्फला अर्धशतक नोंदवण्यात अपयश आले. डेव्हिड्सने त्याआधी सनरायजर्सच्या डावात ४ षटकांत १८ धावांत १ बळी घेतला, तर डेव्हिड विसीने १७ धावांत ३ बळी घेतले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Easy titans win makes clt20 road difficult for sunrisers hyderabad