Most Expensive Player In IPL History : आयपीएलचा १६ वा सीजन ३१ मार्च २०२३ पासून सुरु होणार असून नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि सीएसके यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. जगात सर्वात श्रीमंत टूर्नामेंट म्हणून इंडियन प्रीमियर लीगकडे पाहिलं जातं. या आयपीएलमध्ये दिग्गज खेळाडूंना कोट्यावधी रुपये देऊन खरेदी केलं जातं. खेळाडूंच्या संपूर्ण क्रिकेट करिअरचा आढावा घेऊन आयपीएलच्या लिलावात खेळाडूंवर बोली लावली जाते. अशातच आम्ही तुम्हाला आयपीएल इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडूंबाबत सविस्तर माहिती सांगणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम करन यंदाच्या आयपीएल २०२३ मधील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. पंजाब किंग्जने सॅम करनला १८.५० कोटी रुपयांत खरेदी केलं आहे. तर ऑस्ट्रेलियन खेळाडू कॅमरून ग्रीन दुसरा महागडा खेळाडू ठरला असून मुंबई इंडियन्सने ग्रीनला १७.५ कोटी रुपयांत खरेदी केलं. दरम्यान, आयपीएल इतिहासात आतापर्यंत कोणते खेळाडू कोट्यावधी रुपयांच्या घरात पोहोचले, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती..

आयपीएल इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू

१) सॅम करन – पंजाब किंग्ज, १८.५० कोटी, IPL 2023
२) इशान किशन – मुंबई इंडियन्स, १५.२५ कोटी, IPL 2022
३) ख्रिस मॉरिस – राजस्थान रॉयल्स, १६.२५ कोटी, IPL 2021
४) पॅट कमिन्स – कोलकाता नाईट रायडर्स, १५.५ कोटी, IPL 2020
५) जयदेव उनादकट, राजस्थान रॉयल्स, वरुण चक्रवर्ती, किंग्ज इलेव्हन पंजाब, ८.४ कोटी, IPL 2019
६) बेन स्टोक्स (राजस्थान रॉयल्स), १२.५ कोटी, IPL 2018
७) बेन स्टोक्स (आरपीएस), १४.५ कोटी, १४.५ कोटी, IPL 2017
८) शेन वॉटसन, (आरसीबी), ९.५ कोटी, IPL 2016
९) युवराज सिंग, (डीडी), १६ कोटी, IPL 2015
१०) युवराज सिंग, (आरसीबी), १४ कोटी, IPL 2014
११) ग्लेन मॅक्सवेल, मुंबई इंडियन्स, ६.३ कोटी, IPL 2013
१२) रविंद्र जडेजा, (सीएसके), १२.८ कोटी, IPL 2012
१३) गौतम गंभीर (केकेआर), १४.९ कोटी, IPL 2011
१४) शेन बॉण्ड, (केकेआर) कायरन पोलार्ड (एमआय), ४.८ कोटी, IPL 2010
१५) केविन पीटरसन, (आरसीबी), अॅंण्ड्र्यू फ्लिंटॉप, (सीएसके), ९.८ कोटी, IPL 2009
१६) एस एस धोनी (सीएसके), ९.५ कोटी, IPL 2008

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Here is the full list of most expensive players in ipl history punjab kings bought sam curran in 18 5 crore nss
First published on: 29-03-2023 at 16:22 IST