इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन आणि भारताचा माजी क्रिकेटपटू वासिम जाफर यांच्यातील सोशल मीडियावरील ‘वैर’ कोणापासूनही लपून राहिलेले नाही. जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा वॉन कधी जाफरची तर कधी टीम इंडियाची त्याच्या पोस्टद्वारे खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करतो. पण वॉनला बहुतेक वेळा हे चांगलेच महागात पडले आहे. वासिम जाफरने वॉनला नेहमीच प्रत्युत्तर केले आहे. नुकतेच जाफर यांनी रणवीर अलाहबादियाच्या पोडकास्टसाठी हजेरी लावली होती. यामध्ये जाफर यांनी मायकल वॉनवर मजेशीर वक्तव्य केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वासिम जाफर यांनी या पोडकास्टमध्ये अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. भारतीय संघामध्ये फार कमी अष्टपैलू खेळाडू आहेत. बरेचसे खेळाडू हे फलंदाज किंवा पूर्ण वेळ गोलंदाज आहेत. अष्टपैलू खेळाडू कमी आहेत का यामध्ये प्रशिक्षणाचा काही मुद्दा आहे की अजून काही असा प्रश्न जाफर यांना विचारण्यात आला. तेव्हा जाफर म्हणाले, “आजकाल संघांसोबत साईड आर्मर असतात, जे त्या स्टीकने चेंडू फेकतात. हे हल्ली एक प्रोफेशन झालं आहे. प्रत्येक संघात असे १-२ साईड आर्मर असतात, खेळाडूंच्या फलंदाजी सरावासाठी. १४०, १५० हे साईड आर्मरच्या चेंडू फेकण्याच्या कौशल्यावर असते. यामुळे भारताच्या फलंदाजी बाजूमध्ये यामुळे चांगली प्रगती झाली आहे, असं मला वाटतं. कारण या साईड आर्मरमुळे खेळाडूंना वेगवान गोलंदाजीविरूद्ध खेळण्याची सवय झाली आहे. जेव्हा संघ ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकेत खेळायला जातो तेव्हा याचा चांगला परिणाम दिसून येतो.”

हेही वाचा – न्यूझीलंडच्या वर्ल्डकपमधून घरवापसीचा पहिला दणका; केन विल्यमसनने सोडले कर्णधारपद

पुढे सांगताना जाफर म्हणाले, “पण या साईड आर्मरमुळे बरेचसे फलंदाज आता गोलंदाजी करत नाहीत. ते फलंदाजीचा सराव करतात आणि निघून जातात. आमच्यावेळेला असं नव्हतं, त्यावेळेस जेव्हा संघातील अष्टपैलू खेळाडू जेव्हा फलंदाजीला यायचे तेव्हा संघातील फलंदाज त्यांना गोलंदाजी करायचे. पण आता इतके नेट बॉलर आहेत साईड आर्मर आहेत की फलंदाजांनी गोलंदाजी नाही केली तर चालून जातं. यामुळे त्यांच्या गोलंदाजीला वाव मिळत नाही. त्यामुळे सध्या प्रशिक्षकांनी गोलंदाजी करण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. फक्त ८३ च्या वर्ल्डकपमध्ये नाही तर २०११ च्या वर्ल्डकपमध्येही अनेक अष्टपैलू खेळाडू होते. यंदाच्या संघातही अनेक अष्टपैलू नाहीत. गिल, सूर्या, विराट गोलंदाजी करत नाही. रोहितने गोलंदाजी बंद केली आहे. तुमच्याकडे पर्याय नाहीय आणि हेच कारण आहे की तुम्ही इतके स्पर्धात्मक नाही आहात. तुम्ही इंग्लंड, ऑस्ट्रेलियाचा संघ पाहा त्यातही अनेक अष्टपैलू खेळाडू आहेत. आपल्या संघात याची कमतरता आहे.”

हेही वाचा – T20 WC 2024: बांगलादेशच्या खेळाडूवर ICC ची कारवाई, नेपाळविरूद्धच्या सामन्यात कर्णधारासह घातलेला वाद

हेही वाचा – ‘क्रिकेटमध्ये सेक्स ही अत्यंत सामान्य गोष्ट…’, अभिषेक नायरचे मुलाखतीत मोठे वक्तव्य, म्हणाला; “एवढं दडपण असतं की…”

यावर रणवीर म्हणतो, तुमचा हरवलेला भाऊ मायकल वॉन जेव्हा पोडकास्टमध्ये आला तेव्हा त्याने सांगितले की “भारतीय संघ मोठ्या टूर्नामेंट्समध्ये हरतो कारण संघात कदाचित अष्टपैलू खेळाडू कमी आहेत.” यावर जाफर म्हणतात “हो मी तेच सांगतोय. पण तो काही माझा हरवलेला भाऊ वगैरे नाहीय, माझा भाऊ असता तर थोडा चांगला असता.”

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wasim jaffer statement on michael vaughan in podcast watch video said my brother would be better than that bdg