भारतीय संघ पाच तारखेला विश्वचषकातील पहिला सामना खेळणार आहे. त्यापूर्वीच भारतीय संघासाठी धक्कादायक गोष्ट घडली आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सरवादरम्यान जखमी झाला आहे. शनिवारी सराव करताना विराट कोहलीच्या आंगठ्याला दुखापत झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सरावादरम्यान विराट कोहलीच्या आंगठ्याला दुखापत झाली. जवळच असलेले संघाचे फिजिओ पॅट्रीक फराहत यांनी तात्काळ उपचार केले. पॅट्रीक फराहत यांनी विराटच्या आंगठ्यावर स्प्रे मारुन प्राथमिक उपचार केले. त्यानंतर कोहलीने सराव अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला. संघ व्यवस्थापनातर्फे विराट कोहलीच्या दुखापतीबद्दल अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.

विराट कोहलीची दुखपत किती गंभीर आहे हे अद्याप समजू शकले नाही. मात्र, पहिल्या सामन्यापूर्वी कर्णधाराला दुखापत झाल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. विजय शंकर दुखापतीतून सावरला आहे. तर केदार जाधवची अजूनही दुखापतीतून सावरत आहे. त्यातच कोहलीला झालेली दुखापत म्हणजे भारतासाठी मोठी चिंतेची बाब आहे.

दरम्यान, ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतासोबत सामना खेळणार आहे. मात्र या सामन्याआधीच दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. आफ्रिकेचा प्रमुख गोलंदाज कगिसो रबाडाने विराट कोहली अप्रगल्भ खेळाडू असल्याची टीका केली आहे. एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत रबाडाने ही टीका केली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc world cup 2019 worry for india as captain virat kohli picks up injury ahead of 1st match against south africa