आयपीएल १३ मध्ये केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर नटराजनची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी एक नेट गोलंदाज म्हणून निवड केली होती. मात्र, आघाडीचे गोलंदाज दुखापतग्रस्त झाल्यामुळे नटराजनला एकदिवसीय आणि टी-२० संघात स्थान मिळालं होतं. आता कसोटी पदर्पणासाठीही नटराजन सज्ज झाला आहे. नटराजन यानं ट्विट करत आपला आनंद व्यक्त केला आहे. यावेळी त्यानं कसोटी पदार्पणाबाबतचे संकेतही दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुखापतग्रस्त उमेश यादवच्या जागी नटराजानला संघामध्ये स्थान देण्यात आलं आहे. संघात स्थान मिळवण्यासाठी नटराजनला सैनी आणि शार्दूल ठाकूर यांच्याशी स्पर्धा करावी लागणार आहे. नटराजनला २० प्रथमश्रेणी सामन्यांचा अनुभव गाठीशी आहे. गतवर्षी जानेवारीत चेपॉक मैदानावर तो रेल्वेविरुद्ध अखेरचा सामना खेळला होता. या सामन्यात त्यानं तीन बळी घेतले होते.

आणखी वाचा- जाफर गुरुजींचा कानमंत्र : वॉर्नरला बाद करण्यासाठी पंतला दिला सांकेतिक सल्ला, तुम्हाला कळतोय का पाहा

टी नटराजन याने अपल्या अधिकृत ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. फोटोवर त्यानं एक कॅप्शनही लिहिले आहे. “भारतीय कसोटी संघाची जर्सी परिधान करणे हा क्षण माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. मी पुढील आव्हानाचा सामना करण्यासाठी तयार आहे.”  एक जानेवारी रोजी नटराजनला भारतीय कसोटी संघाच्या चमूमध्ये स्थान देण्यात आलं. मेलबर्न कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाज उमेश यादव दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्याजागी यॉर्कर किंगला संधी देण्यात आली आहे.

सिडनी येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात नटरजनला अंतिम ११ मध्ये स्थान मिळणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मात्र नटराजन यानं पोस्ट केलेल्या फोटोमुळे त्याचा संघातील सहभाग निश्चित मानला जात आहे.

आणखी वाचा

सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या संघात महत्वाचे दोन बदल; कर्णधार, प्रशिक्षकानं दिले संकेत

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus t natarajan awaits next challenge as he dons white jersey nck