ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीमध्ये भारताने पहिल्या दिवसअखेर ४ बाद ३०३ अशी मजल मारली. चेतेश्वर पुजाराने आपला फॉर्म कायम राखत या सामन्यातही शतक ठोकले. त्यामुळे भारताला पहिल्या दिवशी त्रिशतकी मजल मारता आली. या सामन्यात पुजाराने मालिकेतील तिसरे शतक ठोकले. दिवसाचा खेळ संपला, तेव्हा तो १३० धावांवर नाबाद होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुजाराच्या खेळीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. सेहवाग हा कायमच आपल्या खास शैलीत शुभेच्छा देण्यास लोकप्रिय आहे. त्याचप्रमाणे आजची त्याने आपल्या ‘सेहवाग स्पेशल’ शैलीत पुजाराचे कौतुक केले आहे. सेहवागने लिहिले आहे की ‘जिंदगी ना मिलेगी पुजारा. पुजाराच्या सातत्यपूर्ण खेळीचने भारवूं जायला होते. तो अतिशय उत्तम खेळ करत आहे.

 

तसेच ऑस्ट्रेलियाच्या भूमीत एका कसोटी मालिकेत ३ शतक झळकावणारा पुजारा हा तिसरा भारतीय फलंदाज ठरला. त्याबाबतही सेहवागने त्याला शुभेच्छा दिल्या. या मालिकेत पुजाराने पहिल्या, तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात शतक ठोकले. या बरोबरच पुजाराने दिग्गज कसोटीपटू आणि माजी कर्णधार सुनील गावस्कर यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्यांनी १९७७-७८ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सर्वप्रथम एकाच मालिकेत ३ शतके ठोकली होती. तर २०१४-१५ च्या मालिकेत भारताचा कर्णधार विराट कोहली याने एकच मालिकेत तीन शतके ठोकली होती. त्यानंतर मालिकेत ३ शतके ठोकणारा पुजारा हा तिसरा फलंदाज ठरला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus virender sehwag tweets and praises cheteshwar pujara