IPL 2023, MI vs LSG Highlights Cricket Score Update: लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा पाच धावांनी पराभव केला. या विजयासह लखनऊचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. या सामन्यात लखनौने प्रथम फलंदाजी करताना १७७ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ केवळ १७२ धावा करू शकला आणि पाच धावांनी सामना गमावला. लखनौकडून मार्कस स्टॉइनिसने सर्वाधिक नाबाद ८९ धावा केल्या. त्याचवेळी कर्णधार क्रुणाल पांड्याने ४९ धावांची खेळी केली. मुंबईकडून जेसन बेहरेनडॉर्फने दोन गडी बाद केले.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या लखनऊ संघाची सुरुवात खराब झाली. ५० धावांच्या आतच संघाचे पहिले तीन खेळाडू बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतले. क्विंटन डी कॉक आणि दीपक हुडा सलामीवीर लवकर बाद झाले, त्यांना विशेष कामगिरी करू शकले नाहीत. दीपक हुडा अवघ्या ५ धावा करून बाद झाला. यानंतर प्रेरक मांकडला भोपळाही फोडता आला नाही. क्विंटन डी कॉकने क्रुणाल पांड्यासोबत भागीदारी करत संघाची धावसंख्या ३०च्या पुढे नेली, पण त्यानंतर तोही इशान किशनच्या हाती झेलबाद झाला. संघाचा कर्णधार क्रुणाल पांड्या मोक्याच्या क्षणी दुखापतग्रस्त झाला आणि त्याने मैदान सोडले. क्रुणालने ४२ चेंडूत ४९ धावा केल्या. यानंतर मार्कस स्टॉयनिसने डावाची सूत्रे आपल्या हाती घेत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. त्याने निकोलस पूरनला हाताशी घेत अर्धशतकी भागीदारी केली. स्टॉयनिसने वेगवान फलंदाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने ४७ चेंडूत ४ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने ८९ धावांची सर्वोच्च नाबाद खेळी खेळली. पूरणनेही ८ चेंडूत ८ धावा करत त्याला साथ दिली. मुंबईच्या जेसन बेहरेनडॉर्फने सर्वाधिक २ गडी बाद केले त्याला पीयूष चावलाने १ गडी बाद करत मदत केली.

दोन्ही संघांना प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. पण जो संघ जिंकेल तो प्लेऑफच्या जवळ जाईल. त्यामुळे या सामन्यात लखनऊ आणि मुंबईच्या कर्णधारांच्या नजरा विजयाकडे असतील. लखनऊने आतापर्यंत १२ सामने खेळले असून त्यात त्यांचे १३ गुण आहेत. मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊला अजून खेळायचे आहे. त्यांनी दोन्ही सामने जिंकले तर ती सहज प्ले ऑफमध्ये पोहोचेल. एक सामना जिंकून आणि एक सामना गमावूनही पुढे जाऊ शकतात, पण नेट रनरेट महत्त्वाचा असेल. दोन्ही लढतींमध्ये हरल्यास ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल.

Live Updates

Mumbai Indians vs Lukhnow Super Giants Highlights IPL 2023: मुंबई इंडियन्स वि लखनऊ सुपर जायंट्स हायलाइट्स अपडेट्स

18:15 (IST) 16 May 2023
MI vs LSG: ‘करो या मरो’ सामन्यात कोणता संघ मिळवणार प्ले ऑफ चे तिकीट?

आयपीएल २०२३चा ६३वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात मंगळवारी (१६मे) लखनऊच्या एकाना स्टेडियमवर खेळवला जाईल. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत हे दोन्ही संघ एकूण २ वेळा आमनेसामने आले आहेत आणि यादरम्यान दोन्ही लखनऊ संघाने विजय मिळवला आहे. या मोसमात या दोघांची ही पहिली लढत आहे. यापूर्वी दोन्ही संघ गेल्या मोसमात दोनदा आमनेसामने आले होते.

https://twitter.com/IPL/status/1658443056495083521?s=20

Mumbai Indians vs Lukhnow Super Giants Highlights IPL 2023: मुंबई इंडियन्स वि लखनऊ सुपर जायंट्स हायलाइट्स अपडेट्स

इंडियन प्रीमिअर लीग मधील ६३व्या सामन्यात एमआय पलटणवर लखनऊ सुपर जायंट्सने पाच धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. या पराभवामुळे मुंबईचा प्ले ऑफचा मार्ग खडतर झाला आहे.