अपेक्षा टाकळेच्या अष्टपैलू खेळाच्या बळावर मुंबईच्या शिवशक्ती संघाने चिपळूण तालुका स्पोर्ट्स अकादमी संघावर २५-१३ असा अपेक्षा उंचावणारा विजय मिळवला. त्यामुळेच पांचगणी व्यायाम मंडळातर्फे अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पध्रेत शिवशक्तीला विजयी सलामी नोंदवता आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अपेक्षाने प्रारंभीपासून महत्त्वाचे गुण घेण्याचा सपाटा लावल्यामुळे मध्यंतरालाच शिवशक्तीने १७-१० अशी आघाडी घेतली होती. उत्तरार्धातही शिवशक्तीने सामन्यावरील पकड सोडली नाही. रक्षा नारकरच्या पकडी आणि पूजा यादवच्या चढायांची अपेक्षाला छान साथ लाभली.

याचप्रमाणे मुंबई उपनगरमधील महात्मा गांधी स्पोर्ट्स क्लबने गोरेगावच्या संघर्षचा २८-१२ अशा फरकाने सहज पराभव केला. गांधी संघाकडून मीनल जाधव आणि पूजा जाधव यांनी अप्रतिम पकडी केल्या, तर पूजा केणीने नेत्रदीपक चढाया केल्या. तसेच पुण्याच्या जागृती संघाने धरमवीर प्रतिष्ठानचे आव्हान २२-१९ अशा फरकाने मोडीत काढले. जागृतीकडून निशू सिंगने लाजवाब चढाया केल्या, तर धरमवीर संघाकडून कोमल गुजर छान खेळली.

व्यावसायिक पुरुष विभागात मुंबई बंदरने रिझव्‍‌र्ह बँकेचा २३-६ असा पराभव केला, तर मध्य रेल्वेने महावितरणवर चुरशीच्या लढतीत २०-१९ अशी मात केली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sivasakthi expect increment victory