शानदार सांघिक कामगिरीच्या जोरावर विदर्भने मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेत बलाढय़ तामिळनाडूवर ७ विकेट्सनी मात केली. विदर्भने तामिळनाडूला १५० धावांतच रोखले. बाबा अपराजितने ४१ तर राजगोपाल सतीशने ३२ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना विदर्भने जितेश शर्माच्या अर्धशतकाच्या बळावर ३ विकेट्सच्या मोबदल्यात हे लक्ष्य गाठले. जितेशने ४७ चेंडूत ९ चौकार आणि एका षटकारासह ७३ धावांची खेळी केली. फैझ फझलने ६ चौकारांसह ४५ धावा केल्या. या दोघांनी ८७ धावांची सलामी देत विदर्भच्या विजयाचा पाया रचला.
संक्षिप्त धावफलक
तामिळनाडू : २० षटकांत ८ बाद १५० (बाबा अपराजित ४१, रवीकुमार ठाकूर २/२२) पराभूत विरुद्ध विदर्भ : १८.३ षटकांत ३ बाद १५३ (जितेश शर्मा ७३, फैझ फझल ४५)

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Syed mushtaq ali trophy 2015 16 vidarbha beat tamil nadu by 7 wickets