FIDE World Cup Chess Tournament : भारतीय ग्रॅंडमास्टर आर प्रज्ञानंदने बुद्धीबळाच्या फिडे वर्ल्डकप २०२३ टूर्नामेंटच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. १८ वर्षीय प्रज्ञानंदने टायब्रेकमध्ये जगात तिसऱ्या क्रमांकावर असणारा खेळाडू फाबियानो करुआनाला ३.५-२.५ ने पराभूत केलं आहे. प्रज्ञानंदने चमकदार कामगिरी करून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. दोन सामन्यांची क्लासिकल सीरिज १-१ ने बरोबरीत संपल्यानंतर भारतीय प्रज्ञानानंदने खूप रोमांचक टायब्रेकरमध्ये अमेरिकेच्या दिग्गज ग्रॅंडमास्टरला मागे टाकले. आता अंतिम फेरीत प्रज्ञानंदचा सामना नॉर्वेच्या मॅग्नेस कार्लसनशी होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रमेशबाबू प्रज्ञानंद बुद्धीबळातील ग्रॅंडमास्टर आहे. बुद्धीबळ खेळात भारतातील प्रतिभावंत खेळाडू म्हणून प्रज्ञानंदला ओळखलं जातं. तो १० वर्षांचा असतानाच इंटरनॅशनल मास्टर बनला. तर १२ वर्षांचा असताना प्रज्ञानंद ग्रॅंडमास्टर झाला. त्यावेळी अशी कामगिरी करणारा प्रज्ञानंद सर्वात कमी वय असलेला दुसरा खेळाडू बनला होता. आता भारतातील बुद्धबळाचे चाहते अशी आशा करत आहेत की, तो फायनलमध्ये मॅग्नस कार्लसनचा पराभव करेल.

नक्की वचा – Asia Cup 2023: आशिया चषकात युजवेंद्र चहलला का दिला डच्चू? चहलची ट्वीटर पोस्ट झाली व्हायरल, म्हणाला…

भारताचे महान बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंद यांनी प्रज्ञानंदला ट्वीटरवर पोस्ट शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटलंय की, “प्रज्ञानंद फायनलमध्ये पोहोचला! त्याने टायब्रेकमध्ये फाबियानो करुआनाचा पराभव केला आणि त्याचा सामना मॅग्नस कार्लसन विरोधात होणार आहे. काय जबरदस्त प्रदर्शन आहे.” विश्वनाथन आनंद भारतातील दिग्गज चेस प्लेयर आहेत. त्यांनी वर्ष २००० आणि २००२ मध्ये फिडे वर्ल्डकपचा किताब जिंकला होता.

सामना जिंकल्यानंतर प्रज्ञानंदने दिली प्रतिक्रिया, म्हणाला…

सेमीफायनल जिंकल्यानंतर प्रज्ञानंद माध्यमांशी बोलताना म्हणाला, मला या टूर्नामेंटमध्ये मॅग्नेस विरोधात खेळण्याची जराही आशा नव्हती. मी फायनलमध्ये पोहोचेल, असं मला वाटत नव्हतं. मी खेळात प्रचंड मेहनत घेण्याचा प्रयत्न करेल. पुढे काय होतं, ते पाहावं लागेल.

राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि नवीन पटनायक यांनी दिल्या शुभेच्छा

प्रज्ञानंदच्या विजयासाठी अनेक लोकांनी शुभेच्छा दिल्या. यामध्ये कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचाही समावेश आहे. याशिवाय प्रियंका गांधी, ओडीसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीही प्रज्ञानंदला विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is r praggnanandhaa 18 year old chess grandmaster player entered in the final of fide world cup chess tournament 2023 nss