Drinking Water from a Copper Vessel Impact Your Body: आपल्या पूर्वजांनी तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याचे अनेक फायदे सांगितले आहे. अगदी राजघराण्यापासून ते मध्यमवर्गीयांपर्यंत अनेक जण तांब्याच्या भांड्यातून पाणी पितात यामागे शास्त्र आहे. हेल्थलाईनच्या माहितीनुसार तांब्यामध्ये अशी अनेक पोषक तत्व असतात जी शरीराला निरोगी ठेवण्यासाठी मदत करू शकतात. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने मेंदू, हृदय तंदुरुस्त राहण्यास मदत होऊ शकते.आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार ४८ तास आपण तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून मग प्यायल्यास यामुळे पाण्यातील बॅक्टेरिया मरून जातात. हे पाणी प्यायल्याने आरोग्यावर नेमका कसा प्रभाव होतो हे आता आपण पाहुयात..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायल्याने काय फायदे होतात?

आहार तज्ज्ञ गरिमा गोयल (Dietician Garima Goyal) यांच्या माहितीनुसार तांबे हे पोटाच्या आरोग्यसाठी गुणकारी असते. तांब्याच्या भांड्यातील पाण्याने पचनप्रक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. यामुळे सतत येणारे करपट ढेकर, उलट्या, मळमळ, शौचास साफ न होणे असे त्रास सुरू होण्यास मदत होते. तांब्यामध्ये अँटी इन्फ्लेमेंटरी गुणसत्व असतात ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवल्याने पाणी अल्कलाईन होते यामुळे शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यास मदत होते.

प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथांच्या माहितीनुसार तांब्याच्या भांड्यातील पाण्याने पित्तदोष, वात, कफ असे त्रासही दूर होऊ शकतात. हे पाणी प्यायल्याने जेवण पचवण्यास मदत होते तसेच शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यातही मदत होतात. तांबेयुक्त अल्कलाईन पाणी हे शरीरातील ऍसिड कमी करून शरीरात थंडावा तयार करते.

हे ही वाचा<< ४८ वर्षीय मलायकाच्या रुटीनमध्ये ‘हे’ डिटॉक्स ड्रिंक आहे खास; परफेक्ट बॉडीसाठी ठरू शकतो रामबाण उपाय

तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी कधी प्यावे?

तज्ज्ञांच्या माहितीनुसार तांब्याच्या भांड्यातील पाणी सकाळी प्यायल्याने अधिक फायदे होऊ शकतात. रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे हे सर्वात फायदेशीर मानले जाते. दरम्यान हे लक्षात असुद्या की फायदे असले तरी हे तांबे युक्त पाणी मर्यादित प्यावे. अधिक सेवनाने विषबाधा होण्याचीही शक्यता असते. अधिक तांबं पोटात गेल्यास जे त्रास दूर होऊ शकतात तेच वाढूही शकतात. इतकंच नाही तर लिव्हर खराब होणे, किडनी निकामी होणे असेही त्रास वाढू शकतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drinking water from a copper vessel impact your body know the health benefits and side effect when to drink copper water svs