Causes Of Unwanted Hair Growth : महिला पुरुषांप्रमाणे चेहऱ्यावर दाढी वाढवत नाहीत. पण, काही महिलांच्या चेहऱ्यावर जास्त केस येऊ लागतात. या समस्येला हर्सुटिझम (hirsutism) म्हणतात. त्यामुळे महिलांचा चेहरा, हात, पाठ व छाती यांवर केस (Facial Hair) येऊ लागतात, ज्यामुळे त्यांचे सौंदर्य बिघडते. महिलांच्या शरीरावर हे अनावश्यक केस येण्याची कारणे काय आहेत आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काय करावे याबद्दल या बातमीतून आपण जाणून घेऊ…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम (PCOS) : महिलांमध्ये एंड्रोजन नावाच्या हार्मोन्सची पातळी नेहमीपेक्षा जास्त वाढल्यामुळे ही स्थिती उद्भवू शकते. हे हर्सुटिझमचे मुख्य कारण आहे. पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम (PCOS) मध्ये एंड्रोजनची पातळी खूप वेगाने वाढू लागते आणि त्यामुळे केस वेगाने वाढू लागतात. पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम (PCOS) ग्रस्त महिलांचे मासिक चक्रदेखील विस्कळित होते आणि मग त्यांना वजन कमी करणे खूप कठीण जाते.

अधिवृक्क ग्रंथींशी संबंधित समस्या (Problems related to adrenal glands) : अधिवृक्क ग्रंथी (ॲड्रेनल ग्लॅण्ड्स) शरीरात मूत्रपिंडाच्या अगदी वर स्थित असतात आणि त्यांचे मुख्य काम हार्मोन्सचा स्राव करणे आहे. जन्मजात ॲड्रेनल हायपरप्लासियाने ग्रस्त असलेल्या महिलांमध्ये हार्मोन्स तयार करणाऱ्या एन्झाइम्सची कमतरता असते, ज्यामुळे त्यांच्या गालावर मोठ्या प्रमाणात केस येऊ लागतात.

कुशिंग्ज सिंड्रोम (Cushing’s syndrome) : एक अशी स्थिती, ज्यामुळे शरीरात जास्त प्रमाणात कॉर्टिसोल तयार होतो. हा हार्मोन जो केस, त्वचा आणि इतर अवयवांवर परिणाम करतो. कुशिंग्ज सिंड्रोमच्या इतर लक्षणांमध्ये जलद वजन वाढणे, उच्च रक्तदाब व मधुमेह यांचा समावेश असतो.

गर्भधारणा आणि रजोनिवृत्ती (Pregnancy and Menopause) : गर्भधारणा आणि रजोनिवृत्तीदरम्यान स्त्रियांच्या शरीरात मुख्य हार्मोनल बदल होतात, ज्यामुळे चेहऱ्यावर जास्त प्रमाणात केस दिसू लागतात.

नको असलेले केस येणे कसे थांबवायचे?

तर, चेहऱ्यावरील नको असलेल्या केसांची वाढ थांबवण्यासाठी सर्वप्रथम तुमची जीवनशैली आणि तुमचा आहार सुधारा. जेव्हा तुम्ही तुमचा आहार सुधारता तेव्हा वाढलेले वजन कमी होईल. त्यामुळे तुमचे असंतुलित हार्मोन्सही संतुलित राहतील आणि नको असलेले केस येणे थांबेल. त्याशिवाय चेहऱ्यावरील केस कमी करण्यासाठी तुम्ही लेझर थेरपीचीही मदत घेऊ शकता. यासोबतच तुम्ही घरगुती उपायदेखील वापरू शकता. पण, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Facial hair causes and what to do to and control it ways to remove unwanted hair growth asp