Xiaomi चा दमदार स्मार्टफोन Redmi Note 5 Pro या फोनचा फ्लॅश सेल आज दुपारी १२ वाजेपासून सुरू होणार आहे. फ्लिपकार्ट आणि MI च्या अधिकृत संकेतस्थळावर हा सेल सुरू होणार असून सेलमध्ये फोनचे सर्व व्हेरिअंट्स विक्रीसाठी उपलब्ध असतील. याशिवाय ग्राहकांना हा फोन नो कॉस्ट इएमआयवरही खरेदी करता येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अॅक्सिस बॅंकेच्या कार्डद्वारे खरेदी केल्यास फोनवर 10 टक्के सूट दिली जात आहे. Reliance Jio देखील या फोनवर 2200 रुपयांपर्यंत कॅशबॅक देत आहे. सेलमध्ये 14 हजार 999 इतकी फोनची सुरूवातीची किंमत ठरवण्यात आली आहे.

स्पेसिफिकेशन –
फोनमध्ये 5.99 इंच डिस्प्ले (1080×2160 पिक्सल) आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसरसह येणारा हा शाओमीचा पहिला फोन आहे. 4 GB आणि 6 GB रॅम अशा दोन व्हेरिअंट्समध्ये फोन उपलब्ध असून यामध्ये 64 GB स्टोरेज देण्यात आलं आहे. रेडमी नोट 5 प्रोमध्ये 12 मेगापिक्सल + 5 मेगापिक्सलचा ड्यूअल रिअर कॅमेरा आहे. तर सेल्फीसाठी फोनमध्ये LED फ्लॅशसह 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमरा देण्यात आला आहे. अॅन्ड्रॉइडच्या 8.0 ओरियोवर काम करणाऱ्या या फोनमध्ये 4000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flash sale of redmi note 5 pro on flipkart and mi site