मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनचं तीव्र उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात घराबाहेर पडताच जीव कासावीस होऊ लागतोय. दहा मिनिटं उन्हात फिरलो तरी खूप घाम येत तहान लागते. अशावेळी आपण स्वत:ला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी, लिंबू सरबत, कोल्ड्रिंक्सचा आधार घेतो. उन्हाळ्यात रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी आपल्याला लिंबू सरबताचे स्टॉल्स दिसतात. त्यामुळे अनेकजण कोल्ड्रिंक्सपेक्षा लिंबू पाण्याचं सेवन करतात. पण काहींना उष्णतेपासून वाचण्यासाठी दिवसातून ३ ते ४ वेळा लिंबू पाणी पितात. लिंबू पाणी फक्त उष्णतेपासूनचं आराम देत नाही तर तुम्हाला ताजेतवाने ठेवते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त पोटॅशियम आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळते, जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण तुम्हाला माहीत आहेच की, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक आरोग्यासाठी हानिकारक ठरतो. यामुळे तुम्ही देखील दिवसातून एकापेक्षा जास्त वेळा लिंबू पाणी पीत असाल तर ते आरोग्यासाठी घातक ठरू शकते. लिंबूमध्ये आढळणाऱ्या व्हिटॅमिन सीमुळे पोटाशी संबंधित आजारांपासून दूर राहता येते. पण त्याचा अतिरेक वापर केल्याने तुमच्यासाठी अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

तुपातली कॉफी प्यायल्यानं झटपट वजन कमी होतं? का होतेय ‘ही’ कॉफी ट्रेंड

जास्त लिंबू पाणी पिल्याने उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मायग्रेनचा त्रास वाढतो.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, लिंबू हे फळ आंबट असल्याने त्याच्या जास्त सेवनाने मायग्रेनची समस्या आणखी वाढू शकते. लिंबूमध्ये टायरामीन हा घटक असतो ज्यामुळे डोकेदुखी होऊ शकते. यामुळे मायग्रेनचा त्रास असलेल्या लोकांनी लिंबू पाण्याचे अतिसेवन टाळावे.

हाडे कमकुवत होतात.

लिंबू हळूहळू सांध्यातील तेल शोषून घेते, ज्यामुळे दीर्घकाळ हाडांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. या कारणास्तव लिंबाचा अतिवापर करु नका.

पोटदुखी होऊ शकते.

व्हिटॅमिन सीच्या जास्त सेवनामुळे पोटात ऍसिडिक सिक्रिशन वाढण्याची भीती असते कारण त्यामुळे ऍसिडिटीचा धोका वाढतो. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. जर तुम्ही ते जास्त प्यायले तर ते पोटात ऍसिडिक स्राव वाढवते. त्यामुळे पोटात दुखू लागते इतकेच नाही तर यामुळे उलट्या होऊ लागतात.

दात कमकुवत होण्यासह अल्सरचा धोका.

लिंबूमध्ये आढळणाऱ्या सायट्रिक ऍसिडमुळे तोंडाच्या ऊतींमध्ये जळजळ होते, ज्यामुळे तोंडात अल्सर होते.. तसेच जास्त प्रमाणात लिंबू पाणी प्यायल्याने दात कमकुवत होऊ शकतात.

डिहायड्रेशनचा धोका.

उन्हाळ्यात लिंबू पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण जास्त लिंबू पाणी पिल्याने डिहायड्रेशन होऊ शकते. जास्त सेवन केल्याने वारंवार लघवी होऊ शकते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health tips beware of these 5 side effects of lemon water sjr