हेपॅटिटिसची लागण असलेल्या रुग्णांवर तातडीने उपचारांची गरज आहे, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. आग्नेय आशियात  हेपॅटिटिसची लागण जास्त असून त्यात तातडीने कृती करण्याची गरज प्रतिपादन करण्यात आली. जागतिक हेपॅटिटिस दिनानिमित्त आग्नेय आशियाच्या प्रादेशिक संचालक डॉ.पूनम खेतरपाल सिंह यांनी सांगितले, की दर दहा व्यक्तींपैकी एकाला हेपॅटिटिसची लागण झालेली असते. त्यामुळे जगात व आग्नेय आशियात या रुग्णाकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची वेळ आली आहे. यातील फार कमी रुग्णांना यावर उपचार मिळतात. दरवर्षी आग्नेय आशियात हेपॅटिटिसच्या लागणीमुळे ४ लाख १० हजार जणांचा मृत्यू होतो. विषाणूवर आधारित  हेपॅटिटिस वाढत असून ४० दशलक्ष लोकांना हेपॅटिटिस बीची लागण झालेली आहे. तर १० दशलक्ष लोकांना हेपॅटिटिस सीची लागण झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बांगलादेश, भूतान, कोरिया, भारत, इंडोनेशिया, मालदीव, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका, थायलंड व तिमोर यांचा त्यात समावेश आहे. पन्नास टक्के लोकांना त्यांची याबाबतची आरोग्यावस्था समजली पाहिजे व किमान ७५ टक्के लोकांवर निदान करून उपचार सुरू केले पाहिजेत. हे उद्दिष्ट २०२० पर्यंत गाठले जाणे आवश्यक आहे. नव्वद टक्के बालकांना जन्म झाल्यानंतर हेपॅटिटिस बी लस दिली पाहिजे तर ९५ टक्के मुलांना त्याचे तीन डोस दिले गेले पाहिजेत. यातील चाचणी संच किफायतशीर असले पाहिजेत. त्यात एचआयव्ही, कर्करोग, या इतर रोगांचे निदान होणे आवश्यक आहे. आता औषधांनी हेपॅटिटिस सीची लागण ९५ टक्के रुग्णांत कमी करता येते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hepatitis