Perfect Way To Eat Honey: वजन कमी करायचं आहे? रक्तातील साखर नियंत्रणात ठेवूनही गोड खायची इच्छा पूर्ण करायची आहे? हाडांना मजबुती द्यायची आहे? या व अशा कित्येक कारणांसाठी मध खाण्याचा सल्ला दिला जातो. कित्येक पिढ्या मधासारख्या नैसर्गिक साखरेच्या वापरामुळे फिट राहिल्याचे आपणही पाहिले असेल. पण तुम्हाला माहीत असेल प्रत्येक गोष्टीला काही नियम व बंधने असतात, आणि जर का आपण त्याचे पालन केले नाही तर याचा गंभीर परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतो. याच न्यायाने मधाच्या वापराबाबतही आपण सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

योगी, आध्यत्मिक गुरु म्हणजेच सद्गुरू यांचे सोशल मीडियावर तब्बल १ कोटीच्यापेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. या सर्व फॉलोवर्ससह सद्गुरू अनेकदा शरीर व मनाला सुदृढ ठेवण्याच्या टिप्स शेअर करत असतात. याच एका पोस्टमध्ये सद्गुरू यांनी मधाच्या सेवनाचे नियमही सांगितले आहेत. शिवाय कोणत्या चुका केल्यास मध आपल्या शरीरात विषासमान काम करू शकते याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले आहे. या चुका कोणत्या व तुम्हीही याच चुका करत नाही ना? हे तपासून पाहूया..

सद्गुरू सांगतात की तुम्ही मध कसे खाता यावर अनेक गोष्टी ठरत असतात. उदाहरणार्थ मध कच्चे खाल्ले, गरम पाण्यात मिसळून प्यायलायत, मध खाल्ल्यावर थंड पाणी प्यायलात या प्रत्येक कृतीचा वेगळा पडसाद शरीरावर उमटत असतो. वजन कमी करण्यासाठी जर तुम्ही मध व कोमट पाणी पिणार असाल तर ते कधीही पाणी उकळताना पाण्यात टाकण्याची चूक करू नका. यामुळे मध विषयुक्त होऊ शकते. याही पुढे जाऊन सांगायचं तर मध शिजवणे टाळाच.

मधाच्या सेवनाची योग्य पद्धत कोणती?

तज्ज्ञांच्या मते मध खाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे कच्चा म्हणजे खरेदी केलेला किंवा पोळ्यातून काढलेला मध हा उत्तम ठरतो. मात्र तुम्हाला दूध किंवा लिंबू पाण्यात टाकून मधाचे सेवन करायचे असेल तर निदान तुमचं पेय रूम टेम्परेचर किंवा थंड झालं असेल याची खात्री करा. आयुर्वेदात सुद्धा कोमट किंवा गरम मध हे विषारी ठरू शकते असे सांगण्यात आले आहे.

१ चमचा मधामध्ये नेमकं काय दडलंय? (Honey Nutritional Values)

फूडडेटा सेंट्रलनुसार, एक चमचा किंवा २१ ग्रॅम कच्च्या मधामध्ये ६४ कॅलरीज आणि १७ ग्रॅम साखर असते. कॅल्शियम, मॅग्नेशियम, नियासिन, पोटॅशियम, जस्त अशा सूक्ष्म पोषक घटकांनी मध समृद्ध असते याव्यतिरिक्त, मध हे अमीनो ऍसिड, एन्झाईम्स आणि इतर फायदेशीर पोषकांचा चांगला स्रोत आहे.

हे ही वाचा<< नवजात चिमुकलीची बोटं बघून कुटुंबाला आश्चर्याचा धक्का! ‘पॉलीडॅक्टिली’ स्थिती व त्याचे उपचार काय?

मधामध्ये अनेक पोषक तत्वे, अँटिऑक्सिडंट्स आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे रोगांपासून लढण्यासाठी मदत करतात. मधाचे सेवन केल्याने जखम बरी होण्याचा वेग वाढतो तसेच वजन कमी करण्यास मदत होते. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या म्हणजे पोटाचे किंवा आतड्यांचे विकार असल्यास मधाचे सेवन फायदेशीर ठरू शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते आणि तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला आवर्जून घ्या)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Honey can become poisonous in body avoid making mistakes sadhguru tells perfect way to consume honey loose weight svs