आंतरराष्ट्रीय संगीत दिवस हा एक वार्षिक उत्सव आहे जो संगीताचे कौतुक करण्यासाठी साजरा केला आहे. हा दिवस जगाच्या वेगवेगळ्या ठिकाणीविविध प्रकारच्या संगीताची प्रशंसा करण्यासाठी समर्पित केला आहे. आंतरराष्ट्रीय संगीत परिषदेने हा दिवस साजरा करण्याचा ठराव मंजूर केल्यानंतर ऑक्टोबर १९७५ मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय संगीत दिन साजरा करण्यात आला. हा सण कधी साजरा केला जातो, त्याचा इतिहास, महत्त्व आणि तुम्हाला माहित असणे आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी जाणून घ्या

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आंतरराष्ट्रीय संगीत दिवस २०२३ तारीख:
आंतरराष्ट्रीय संगीत दिवस दरवर्षी १ ऑक्टोबर रोजी येतो. प्रसिद्ध व्हायोलिन वादक आणि माजी आंतरराष्ट्रीय संगीत परिषदेचे (IMC) अध्यक्ष, येहुदी मेनुहिन यांनी आंतरराष्ट्रीय संगीत दिवस म्हणून घोषित केल्यानंतर १९७५ मध्ये त्याच दिवशी पहिल्यांदा साजरा करण्यात आला. या दिवसला अधिकृतपणे युनेस्कोने ओळख दिली आहे.

हेही वाचा – सडपातळ लोकांच्या शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त का असते? तुमचा आहार असू शकतो कारणीभूत? तज्ज्ञांकडून जाणून घ्या

आंतरराष्ट्रीय संगीत दिवस २०२३ इतिहास आणि महत्त्व:
१९४९ मध्ये, युनेस्कोने संगीतावर सल्ला देण्यासाठी आंतरराष्ट्रीय संगीत परिषद ही सल्लागार संस्था स्थापन केली. नंतर १९७३ मध्ये, स्वित्झर्लंडमधील १५व्या महासभेटच्या वेळी, IMC ने संगीतासाठी एक विशेष दिवस समर्पित करण्याचा ठराव मंजूर केला आणि १९७४ मध्ये, येहुदी मेनुहिनने १ ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय संगीत दिवस म्हणून चिन्हांकित करण्याची घोषणा केली. येहुदी मेनुहिन हा अमेरिकन वंशाचा ब्रिटीश व्हायोलिन वादक आणि कंडक्टर होता ज्याने आपली बहुतेक कामगिरी ब्रिटनमध्ये केली. पहिला आंतरराष्ट्रीय संगीत दिवस १ ऑक्टोबर १९७४ रोजी साजरा करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय संगीत दिन जगभरातील संस्कृतींमध्ये संगीत आणि विविध प्रकारच्या संगीत कलांचा सराव साजरा करतो. संगीत रसिक या दिवशी विविध संस्कृती आणि समुदायातील संगीताच्या सौंदर्याचे कौतुक करतात. हा दिवस विविध जागतिक संस्कृतींमध्ये शांतता आणि सौहार्दाला प्रोत्साहन देतो.

हेही वाचा – International Music Day : ‘म्युझिक थेरपी’ म्हणजे काय? या उपचाराच्या मदतीने मानसिक आजार दूर होऊ शकतो का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….

जगात एकोपा आणि शांतता वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय संगीत दिवस दरवर्षी १ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो, तर जागतिक संगीत दिवस २१ जून रोजी साजरा केला जातो. हा दिवस लोकांना संगीताचा सराव करण्यासाठी आणि सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजवण्यास प्रोत्साहित करतो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International music day 2023 date history significance all you need to know snk