फिफा वर्ल्ड कपचा फिवर सध्या सगळीकडेच जोरदार पहायला मिळत आहे. दरवेळी सामने पहायला आपण टीव्हीसमोर असूच असे नाही. त्यामुळे हे सामने ऑनलाइन पाहता यावेत यासाठी टेलिकॉम कंपन्या खास सुविधा उपलब्ध करुन देतात. या सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग अनेक कंपन्या मोबाईलवर मोफत दाखवणार आहेत. त्यामुळे फुटबॉलप्रेमींसाठी ही नक्कीच आनंदाची बाब आहे. यामध्ये केवळ सामनेच नाही तर सामन्यांच्या मागे घडणाऱ्या गोष्टीही यामध्ये दाखविल्या जाणार आहेत. जिओ आणि एअरटेल या दोन कंपन्या आपल्या युजर्सना फिफाचे स्ट्रीमिंग मोफत दाखवणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिओ युजर्स फिफा लाईव्ह स्ट्रीमिंगशिवाय भारत विरुद्ध अफगाणिस्तान टेस्ट मॅच अॅपशिवायही ब्राऊजरवरुन लाईव्ह पाहता येणार आहे. याशिवाय युजर्स आपला लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर टीव्हीला जोडून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहू शकतील. याशिवाय एअरटेल युजर्सना फक्त आपले एअरटेल टीव्ही अॅप अपडेट करायचे आहे. अपडेट केल्यानंतर एअरटेल टीव्ही अॅपवर युजर्सना फिफा वर्ल्ड कप २०१८ पाहण्याचा पर्याय मिळणार आहे.

जिओ टीव्हीवर हे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहण्यासाठी

१. कोणत्याही ब्राऊझरवर जाऊन jioTV असे टाकावे

२. यावर येणाऱ्या लॉगइन बटणावर क्लिक करावे. वर उजव्या बाजूला हे बटण दिसेल.

३. त्यानंतर तुम्हाला जिओ आयडी टाकावा लागेल.

४. मग तुम्हाला अनेक चॅनेल्सची यादी दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर फिफा वर्ल्ड कप २०१८ मॅच पाहता येणार आहे.

याशिवाय वोडाफोन अॅपवर वर्ल्ड कपच्या निमित्ताने एक स्पर्धा आयोजित केली आहे. खेळात जिंकणाऱ्यांना मिनी आयपॅड मिळणार आहे. तर बम्पर विजेत्याला १ लाख रुपयांचे ट्रॅव्हल  व्हाऊचर मिळणार आहे. जास्त डेटा वापरणाऱ्यांना मोबाईल ऑपरेटरकडून विशेष कंटेंट मिळणार आहे. विशेष म्हणजे एअरटेल, जियो आणि बीएसएनएलने फिफा वर्ल्ड कप साठी स्पेशल रिचार्ज ऑफर आणले आहेत.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jio and airtel users can get free live streaming of fifa world cup 2018 football