कर्करोग झालेल्यांनी किमान तीन वर्षे नियमितपणे जीवनसत्त्व ‘ड’ची मात्रा घेतल्यास ते जगण्याचा कालावधी आणखी काही वर्षे वाढू शकतो, असे एका अभ्यासात दिसून आले आहे. याबाबत अमेरिकेतील मिशिगन स्टेट विद्यापीठातील संशोधकांनी अभ्यास केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जीवनसत्त्व ‘ड’मुळे हाडे मजबूत होण्याबरोबरच आणखीही महत्त्वपूर्ण लाभ होतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिशिगन स्टेट विद्यापीठाचे तारेक हायकल यांनी सांगितले की, जीवनसत्त्व ‘ड’च्या सेवनामुळे कर्करोग झालेल्या व्यक्तींमध्ये मृत्यूची जोखीम कमी झाल्याचा परिणाम चांगल्या प्रकारे दिसून येतो. पण त्याच वेळी या जीवनसत्त्वामुळे कर्करोगाला प्रतिबंध होऊ शकतो असे दाखविणारा कोणताही पुरावा मिळू शकलेला नाही.

या संशोधकांनी कर्करोग प्रतिबंधाचे उपचार झालेल्या ७९ हजारांहून अधिक रुग्णांची माहिती तपासली. ही माहिती विविध अभ्यासांत नोंदविण्यात आली होती. या अभ्यासांत जीवनसत्त्व ‘ड’ची मात्रा घेणारे रुग्ण आणि मानसिक लाभासाठी औषधोपचार घेतलेल्या रुग्णांची तुलना करण्यात आली होती. हा कालावधी किमान तीन वर्षांचा होता. यात कर्करोग झाल्यानंतर मृत्यू झालेल्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले.

या संशोधनात असे दिसून आले की, जीवनसत्त्व ‘ड’ घेणारे रुग्ण आणि मानसिक लाभासाठी औषधोपचार केलेले रुग्ण यांच्यातील मृत्यूच्या प्रमाणात मोठा फरक आहे. जीवनसत्त्व ‘ड’ हे कर्करुग्णांसाठी किती महत्त्वपूर्ण ठरते, हे यातून दिसून आले, असे हायकल म्हणाले. असे असले तरी जीवनसत्त्व ‘ड’ची नक्की किती मात्रा घ्यावी आणि त्याची रक्तातील पातळी किती असावी, ही माहिती यात मिळाली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vitamin d cancer