नवीन बजेट स्मार्टफोन Redmi 9 Prime भारतात मंगळवारी लाँच झाला. रेडमीच्या या फोनमध्ये 128 जीबी तक इनबिल्ट स्टोरेज आणि 6.53 इंच फुल एचडी+ डिस्प्ले आहे. रेडमी 9 प्राइमच्या 4 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 9,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर, 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 11,999 रुपये आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ई-कॉमर्स वेबसाइट अ‍ॅमेझॉनवर प्राईम डे सेलमध्ये (दि.6 ऑगस्ट) आणि mi.com वर फोनची विक्री सुरु होईल. कंपनी रेडमी 9 प्राइमसोबत बॉक्समध्ये एक कव्हर आणि स्क्रीन प्रोटेक्टर मोफत देत आहे. रेडमी 9 प्राइम हा फोन स्पेस ब्लू, मिंट ग्रीन, सनराइज फ्लेयर आणि मॅट ब्लॅक अशा चार कलरच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे.

Redmi 9 Prime: स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स:-
रेडमी 9 प्राइममध्ये कंपनीने 6.53 फुल एचडी+ डिस्प्ले दिला आहे. तर, सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास आहे. फोनमध्ये 2.0 गीगाहर्ट्ज़ ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो G80 प्रोसेसर देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी ARM माली-G52 जीपीयू आहे. या प्रोससरमुळे गेमिंगचा चांगला अनुभव मिळतो असा कंपनीचा दावा आहे. याशिवाय हँडसेटमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी व 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. स्टोरेज माइक्रोएसडी कार्डद्वारे वाढवता येणं शक्य आहे, या फोनमध्ये ड्युअल सिम आणि एक माइक्रोएसडी कार्ड स्लॉट मिळेल.  रेडमी 9 प्राइममध्ये क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात 13 मेगापिक्सलचा AI प्राइमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल, 5 मेगापिक्सल मॅक्रो आणि 2 मेगापिक्सल डेप्थ कॅमेरा आहे. कॅमेऱ्यात AI सीन डिटेक्शन फीचर मिळेल. तर, सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलचा AI फ्रंट कॅमेरा आहे. तसेच फास्ट चार्जिंग सपोर्टसह फोनमध्ये 5020mAh क्षमतेची बॅटरी आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 3.5 एमएम ऑडिओ जॅक, वायरलेस एफएम रेडिओ, आयआर ब्लास्टर, ब्लूटूथ 5.0 यांसारखे फीचर्स आहेत.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Xiaomi redmi 9 prime launched in india check price and specifications sas