धुळ्यात भूषण कैलास शिंपी याने बसखाली उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. सकाळी बस स्थानकात हा थरारक प्रकार घडला. बस स्थानकातून बाहेर पडणाऱ्या बसखाली भूषणने स्वतःला झोकून दिले. सुरूवातीला भूषणने एका बसखाली उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र ते शक्य झाले नाही. त्यानंतर भूषणने भुसावळ साक्री या बसखाली उडी घेतली. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. भूषण शिंपी हा पारोळा येथील रहिवासी असून त्याने आत्महत्या का केली? याचे कारण स्पष्ट झालेले नाही. या घटनेनंतर बस स्थानकात खळबळ उडाली. सुरुवातीला काय घडले हे कोणाला लक्षातच आले नव्हते. सीसीटीव्हीची दृश्यं पाहिल्यावर तरुणाचा अपघात न होता त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. आता याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 19 year boy suicide in dhule