तिरुपती येथे बालाजीच्या दर्शनासाठी गेलेल्या बारामतीमधील भाविकांच्या गाडीला अपघात झाल्याने यातील सातहीजण जागीच ठार झाले आहेत.
बारामतीतील काही तरुण स्कॉर्पिओ गाडीतून तिरुपतीच्या दर्शनासाठी निघाले होते. आंध्रप्रदेशमधील कर्नुलजवळ स्कॉर्पिओला अपघात झाला व अपघातात स्कॉर्पिओतील सात तरुणांचा दुर्दैवी अंत झाला. सागर अंकुश रसाळ, सागर बाळासाहेब रसाळ, अजित रामचंद्र रसाळ, अनिल रमेश गवळी, शेखर बापूराव गवळी, ऋषीकेष पोपट गवळी, मोहन दत्तात्रय गवळी, या सातजणांचा अपघातात मृत्यू झाला. मृत युवक देऊळगाव रसाळ, उंडवडी सुप्याचे रहिवासी होते.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 25-05-2015 at 10:07 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 7 dead in car accident at andhra