राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी आमचे राजकीय मतभेद आहेत. पण त्यांच्याकडे जाऊच नये, अशी अस्पृश्यता कशासाठी, असा प्रश्न उपस्थित करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित बारामती दौऱयाचे समर्थन केले. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्पांना तातडीने मंजुरी द्या
ते म्हणाले, नरेंद्र मोदी केवळ शरद पवारांना भेटण्यासाठी बारामतीला जाणार नाहीत. तेथील कृषि विज्ञान केंद्रात चाललेले उपक्रम बघण्यासाठी ते बारामतीला जाणार आहेत. केंद्र सरकारच्या मदतीने एखादा विकासाचा प्रकल्प कुठे सुरू होत असेल, तर पंतप्रधानांनी तिथे जाण्यात गैर काय आहे. शरद पवार यांच्यासोबत आमचे राजकीय मतभेद आहेत. मात्र, त्यामुळे शरद पवारांकडे जाऊच नये, अशी अस्पृश्यता कशासाठी बाळगायची, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
जाचक टोल रद्द करणार
बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीने निर्यातक्षम भाजीपाला गुणवत्ता केंद्र उभारण्यात येत असून, या केंद्राचे भूमिपूजन येत्या शनिवारी बारामती येथे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह आणि फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. शरद पवारही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमानंतर नरेंद्र मोदी बारामतीतील शरद पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी भोजनासाठीही जाणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm devendra fadnavis supports prime ministers visit to baramati