मोहाडी तालुक्यातील खमारीतील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेचे सहायक शिक्षक जी.आर. हलमारे यांनी मुख्याध्यापक बंसोड यांनी हजेरीपटावर स्वाक्षरी करू देण्यास नकार दिला म्हणून बंसोड यांना मारहाण केली.
हे शिक्षक हलमारे दारूच्या नशेत झिंगलेले होते, मुख्याध्यापक बंसोड यांनी मोहाडी पोलिसात तक्रार नोंदविली आहे. हलमारे प्रार्थनेनंतर शाळेत आले. त्यामुळे बंसोड यांनी त्यांना हजेरीपटावर स्वाक्षरी करण्यास मनाई केली. हलमारे मुख्याध्यापकावर धावून गेले व मारहाण केली. घटनेची माहिती कळताच विस्तार अधिकारी शंकर राठोड व गणवीर यांनी शाळेत जाऊन घटनेची चौकशी केली. शिक्षकांचे बयाण घेतले. त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 01-03-2013 at 01:31 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Complaint register in police against teacher assault principal