पुण्यात अभ्यास करुन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चांगलं यश मिळवून अधिकारी झालेल्या दर्शना पवारच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली. तिचा हा मृत्यू संशयास्पद वाटत होता. मात्र ही हत्याच आहे हे आता स्पष्ट झालं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावची दर्शना पवार आठ दिवसांपासून बेपत्ता होती. तिच्या कुटुंबीयांनी याबाबत पोलीस तक्रारही दिली होती. यानंतर आता पोलिसांना तिचा राजगडाच्या पायथ्याशी मृतदेह सापडला. काही दिवसांपूर्वीच दर्शनाला एमपीएससी परीक्षेत यश मिळालं होतं आणि तिची वन खात्यात अधिकारी म्हणून निवड झाली होती. निकालानंतर ती एका सत्कार कार्यक्रमासाठी गेली आणि त्यानंतर बेपत्ता झाली. आता या प्रकरणी तिच्या मित्राचा शोध सुरु करण्यात आला आहे. तिचा मित्र राहुल हांडोरे बेपत्ता झाला आहे.

दर्शना पवारचा मृतदेह जेव्हा सापडला तेव्हा तो कुजायला सुरुवात झाली होती. तिचा मित्र राहुल हांडोरे या घटनेपासूनच बेपत्ता आहे. पोलीस आता त्याचा शोध घेत आहेत.

राहुल हांडोरे कोण आहे?

राहुल हांडोरे हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर लातुक्यातील शाह या गावाचा रहिवासी आहे. आहे. त्याने बी.एस.सी. पर्यंतचंचं शिक्षण घेतलं. त्यानंतर तो पुण्यात MPSC ची तयारी करत होता. दोघांची ओळख पुण्यातच झाली होती. मागील काही महिन्यांपासून दर्शना आणि राहुल एकमेकांच्या चांगल्या संपर्कात होते. याच ओळखीतून दोघेही ट्रेकिंगला गेले असता ही घटना घडली. ९ तारखेला हे दोघं ट्रेकिंगला गेले होते. मात्र दोन ते तीन दिवस दोघांचा पत्ता न लागल्याने अखेल राहुलच्या कुटुंबियांनी १२ जूनला पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.

शवविच्छेदन अहवालात नेमकं काय?

पोलिसांनी केलेल्या शवविच्छेदन अहवालात दर्शना पवारची हत्या झाल्याचं स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शवविच्छेदन अहवालात दर्शनाच्या डोक्यावर आणि शरीरावर जखमा झालेल्या आढळल्या आहेत. यानुसार वेल्हे पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवली आहेत. विविध पोलीस पथकं आरोपीचा शोध घेत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Darshana pawar death pune police search for missing friend probe murder angle scj