धाराशिव : भावाच्या नावे खरेदी केलेल्या शेतजमिनीचा फेरफार करण्यासाठी चार हजाराची लाच मागून तीन हजार रुपये स्वीकारणाऱ्या लाचखोर तलाठ्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कल्याण राठोड असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “प्रफुल्ल पटेल म्हणायचे निवडणुकीत आपला पक्ष टिकणार नाही, त्यामुळे…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते २००४ सालीच…”

हेही वाचा – “होय, मी २००४ सालापासूनच…”, शरद पवारांचा दावा प्रफुल्ल पटेलांना मान्य; म्हणाले, “आमचा सतत अपमान…”

भावाच्या नावे खरेदी केलेल्या शेत जमिनीची नोटीस काढून फेरफारला नोंद करण्यासाठी चक्क चार हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली. ही सगळी प्रक्रिया करण्यासाठी त्याचबरोबर साहेबालाही काही रक्कम देण्यासाठी पैसे द्यावे लागतील असे म्हणून कळंब तालुक्यातील इटकूर सज्जा येथे तलाठी असलेल्या कल्याण शामराव राठोड (वय 43) याने दिनांक १४ मे रोजी तक्रारदाराकडे चार हजार रुपयांची मागणी केली. तरजोडीअंती तीन हजार रुपयांची रक्कम लाच म्हणून स्वीकारण्यासाठी तयारीही दर्शविली. याबाबत कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचखोर तलाठी राठोड यास ताब्यात घेण्यात आले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dharashiv talathi asks for bribe bribery department action case registered ssb