मंदार लोहोकरे, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंढरपूर : माउलीच्या पालखीचे  पहिले गोल रिंगण पुरंदवडे येथे तर तुकोबारायांच्या पालखीचे गोल रिंगण अकलूज येथे संपन्न झाले.भाविकानाच्या उत्साहाला आलेला उधाण , चैतन्य निर्माण करणारे आणि नेत्रदीपक रिंगण सोहळय़ाने वातावरण भक्तीमय झाले. आज माउलीच्या पालखीचे खडूस येथे दुसरे गोल रिंगण होऊन वेळापूर येथे मुक्कमी तर संत तुकारम महारज यांच्या पालखीचे माळीनगर येथ गोल रिंगण होऊन बोरगावी मुक्कमी असणार आहे.

पालखी सोहळय़ातील परमोच्च वेळ म्हणजे गोल रिंगण. लष्करी शिस्त , ठरलेले ठिकाण , रिंगण  लावण्यासाठी चोपदारांचा इशार आणि डोळय़ाचे पाते लवते न लवते तोच अश्वांची धाव अशा या नेत्रदीपक रिंगणाची भाविकाना आस लागलेली असते. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळय़ाचे पहिले गोल रिंगण पुरंदवडे येथे संपन्न झाले. मैदानामध्ये टाळ मृदुंग, डोक्यावर तुळशी वृंदावन घेवून महिला, विणेकरी टाळकरी जमा होऊ लागले. त्यानंतर माउलीची पालखी रिंगणाच्या मध्यभागी आली. लगेच माउलीचा अश्वाचे आगमन झाले. अश्वाची आणी पादुकांची पूजा झाली. चोपदारांनी हातातील दंड गोल फिरवला.उपस्थित भाविकांनी माउली माउलीचा जयघोष तर टाळ मृदुंगाचा जयघोष सुरु असतानाचा अश्वाने वेगाने धावत गोल फेरी पूर्ण केली. आणि मग जमलेल्या भाविकांचा उत्साह अजून वाढला. माउलीच्या अश्वावाची पायाची धूळ मस्तकी लावण्याची लगबग झाली. या नंतर जमलेल्या वैश्नावानी फुगडी , सोंग, आदी खेळ खेळून आपल शीणवठा घालवला. मात्र यावेळी कोणताही गोंधळ गडबड न होता पण त्याचा आनंद घेताना भाविक पाहवयास मिळाला .

 तर दुसरीकडे जगद्गुरू तुकाराम माहाराज यांचा पालखी सोहळा नीरा नदी ओलांडून मंगळवारी सकाळी ८.२० वाजता माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे जिल्ह्यात आगमन झाले.यावेळी संत तुकाराम महाराजांच्या अश्व आणि पादुकाचे पूजन  जिल्हाधिकारी मििलद शंभरकर यांनी केले. तत्पूर्वी पुणे जिल्हा प्रशासनाने भक्तीमय वातावरणात पालखीला निरोप दिला.यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख संतोष महाराज मोरे, माणिक महाराज मोरे यांचा सत्कार करण्यात आला.अकलूज येथील गांधी चौकात नगरपरिषदेच्यावतीने आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी खा, विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात गोल रिंगण संपन्न झाले. माने विद्यालयात पालखीचे आगमन झाल्यानंतर प्रथम पताका, हांडे-तुळशी, विणेकरी, मृदंग व टाळकरी जमले.त्या नंतर मान्यवरांच्या हस्ते अश्व पूजन करुन अश्व रिंगणी धावले. अश्वाचे रिंगणात धावणे हा क्षण टिपण्यासाठी प्रत्येकजण नजरा एकटक लावून बसला होता. लाखों वारकरी, ग्रामस्थ अश्वाचा नेत्रदीपक सोहळा पाहून तृप्त झाले.दरम्यान, आज म्हणजे बुधवारी माउलीची पालखी माळशिरस येथून प्रस्थान ठेवून खडूस फाटा येथे दिसरे गोल रिंगण होऊन पालखी वेळापूर येथे मुक्कामी येणार आहे. तर संत तुकारम महाराजांची पालखी अकलूज येथून प्रस्थान ठेवून  माळीनगर उभे रिंगण झाल्यावर बोरगाव मुक्कमी असणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dnyaneshwar mauli palkhi first ringan in purandavade sant tukaram maharaj palkhi ringan zws
First published on: 06-07-2022 at 02:16 IST