यवतमाळ-कळंब रोडवर चापर्डानजीक ट्रक आणि क्रुझर जीप यांच्यामध्ये जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 11 जण ठार तर सात जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी रात्री 10 च्या सुमारास ही घटना घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अपघातात ठार झालेले सगळेजण कळंब तालुक्यातील पारडी या गावातले रहिवासी होते. जखमी झालेले लोकही पारडीचे आहेत अशीही माहिती मिळाली आहे. हे सगळेजण यवतमाळमध्ये कामासाठी गेले होते. तिथून परतत असताना हा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होत की, क्रूझरमधून प्रवास करणारे 11 प्रवासी ठार झाले. क्रुझरमधील प्रवाशी एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यानंतर परतीच्या मार्गावर असताना हा अपघात झाला. अपघातातील जखमींना  कळंब येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

मृतांची नावे

शोभा सुभाष निब्रड, वणी

सुजीत बाळू डवरे, लालगुडा वणी

वनिता गजानन नवघरे, उटी, ता. महागाव

कुसम अशोक हटकर, माळवांगद, महागाव

पार्वती कैलास गेडाम, वणी

छाया दादाजी लोहकरे, वणी

क्रिश अशोक हटकर, माळवांगद, महागाव

हातूनबी हमिद पठाण, वणी

संगीता दिनेश टेकाम, वणी

अमोल दगडू हटकर, वणी

गजानन कोंडबा नवघरे, उटी

 

जखमींची नावे

देवानंद अशोक हटकर

गोलू सुरेश दुर्गे

आदित्य गजानन नवघरे

 

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fatal accidents on yavatmal kalamb road 8 people killed