अलिबाग: महाड तांबट आळी येथे राहणाऱ्या १६ वर्षीय मुलाचा डोक्यात गोळी लागल्याने मृत्यू झाला आहे. सुयश सुनिल नगरकर असे या मुलाचे नाव आहे. हा घातपात आहे की आत्महत्या हे स्पष्ट झालेले नाही. महाड पोलीस ठाण्यात या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुयशच्या वडिलांकडे परवाना असलेली रायफल बंदूक होती. लोकसभा निवडणुकीसाठी जी शासनजमा करण्यात आली होती. ही बंदूक निवडणूक संपल्यावर त्यांना परत करण्यात आली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : संगणक परिचालक यांना सरकारने दिलासा द्यावा – आमदार रोहित पवार

याच बंदुकीची गोळी कानशिला जवळ लागल्याने, सुयशचा मृत्यू झाला. दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. त्यावेळी त्याच्या कुटूंबातील सर्वजण खालच्या मजल्यावर असलेल्या सदनिकेत होते. ते वरती परतले तेव्हा सुयश रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला आढळून आला. इयत्ता दहावीत शिकणाऱ्या सुयशच्या आकस्मिक मृत्यूने महाड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहेत. महाड पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In alibag at mahad 16 year old boy died of a gunshot wounds in the head rifle firing css