मागील काही दिवसांपूर्वी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना राज्यातून राज्यसभेची उमेदवारी मिळण्यावरुन अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मात्र भाजपाने दोन्ही राज्यसभा उमेदवारांची नावे घोषित केल्याने या चर्चेला पूर्मविराम मिळाला. तर अता विधानपरिषद निवडणुकीसाठी पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यावर बोलताना नावे अनेक चर्चेमध्ये आहेत, पक्ष काय निर्णय घेईल ते आगामी काळात बघुयात असे पंकजा मुंडे म्हणाल्या. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> राज्यसभा बिनविरोध होण्याची शक्यता मावळली ; शिवसेना आणि भाजप लढण्यावर ठाम; घोडेबाजाराची चिन्हे

पंकजा मुडे यांना विधानपरिषदेवर संधी मिळावी, दिल्लीमध्ये मंत्रिपद मिळावं असं अनेकांना वाटतं. मागील अडीच वर्षांपासूनची ही इच्छा आहे. तुमच्या समर्थकांची ही इच्छा तीव्र झालेली आहे. त्यावर आपले काय मत आहे, असे विचारले असता “माझ्याविषयी लोकांची इच्छा हीच माझी शक्ती आहे. सध्या नावे अनेक चर्चेत आहेत. पक्ष काय निर्णय घेईल ते कळेच. काही फार लांब नाहीये. लवकरच समजेल. तेव्हाचं तेव्हा पाहू” अशी प्रतिक्रिया पंकजा यांनी दिली.

हेही वाचा >>> जून महिन्यात कमी पाऊस ; वाऱ्याचा वेग मंदावल्याचा परिणाम; ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान चांगले पर्जन्यमान

राज्यसभा असेल विधानपरिषद असेल यासाठी तुमच्या नावाची चर्चा होते. मात्र पक्ष संधी देत नाही की नेमकं काय घडत आहे. तुम्हाला संधी का मिळत नाहीये, असे पंकजा मुंडे यांना विचारण्यात आले. यावर बोलताना “मी कुठल्या संधीची अपेक्षा करत नाही. कुठल्या संधीसाठी मी प्रयत्नही करत नाही. संधी मिळावी यासाठी वाट पाहणाऱ्या राजकारण्यांमध्ये माझा नंबर नाही. जे मिळते त्याची संधी करुन दाखवणे, संधीचे सोने करुन दाखवणे हे माझं काम आहे. हे माझे संस्कार आहेत. गोपीनाथ मुंडे यांनी जी पदं भुषवली त्या पदाला त्यांनी आणखी मोठं केलं. संधीसाठी रांगेत वाट पाहतेय, ही माझी प्रवृत्ती नाही,” असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

हेही वाचा >>> सरकारी धोरणाबद्दल लातूरमध्ये संमिश्र प्रतिक्रिया ; बारावी, सीईटीच्या प्रत्येकी ५० टक्के गुणांचा विचार

दरम्यान आज भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा स्मृतीदीन आहे. यानिमित्त बीड जिल्ह्यातील गोपीनाथ गडावर संघर्ष दीन सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान उपस्थित राहणार आहेत. यावर बोलताना, “शिवराजसिंह आज महाराष्ट्रात येत आहेत. ओबीसीसाठी, वंचितांसाठी आयुष्य खर्च करणाऱ्या नेत्याच्या समाधीस्थळावर ओबीसींना सुरक्षा देणारा नेता येतोय. ओबीसींचं भविष्य रेखाटण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्य खर्ची घातलं. शिवराजसिंह ओबीसींचं भविष्य सुरक्षित करणारे नेते आहेत. त्यामुळे आम्ही शिवराज यांचं विशेष सन्मान करणार आहोत,” अशी माहिती पंकजा मुंडे यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pankaja munde on legislative council and rajya sabha candidate said not waiting for chance prd
First published on: 03-06-2022 at 11:30 IST