सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा सर्वत्र उडत असल्याचे दिसत आहे. त्यातच बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा विश्वासू बॉडीगार्ड गुरमीत सिंग उर्फ शेरा याने शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. शेराने शुक्रवारी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री येथे शिवबंधन बांधले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसनेने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेराने शिवसेनेत प्रवेश केला असल्याची माहिती दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना शेराने शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शिवसेना नेत्यांना आनंद झाल्याचे दिसत आहे.

गेल्या २२ वर्षांपासून शेरा सलमान खानचा बॉडीगार्ड म्हणून काम करत आहे. शेराला सलमान खानचा अत्यंत जवळचा आणि विश्वासू व्यक्ती म्हणून ओळखले जातो. आता विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी शेरा प्रचारासाठी उतरणार असल्याचे म्हटले जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan bodyguard join shiv sena avb