राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सध्या अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्याकरता आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता उद्धव ठाकरेंनी अहमदनगर दौरा केला. त्यानंतर त्यांनी सरकारवर टीकास्र सोडलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उद्धव ठाकरे म्हणाले की, “एकूणच महाराष्ट्र दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. आता पाऊस लागला तरी तो किती बरसेल, तो बरसल्यानंतर पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल, गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटू शकेल. पण दुबार पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची पिके सुकून गेली आहेत. जी पिके करपून गेली आहेत, सुकून गेलेल्या पळसामध्ये दाणे भरले जाणार नाहीयत. संतापजनक गोष्ट आहे की, गेल्यावर्षी अतिवृष्टी झाली होती त्याची नुकसनाभरपाई अद्यापही मिळालेली नाही. आता नुकसानीचे पंचनामे कधी होतील, ही नुकसान भरपाई कधी मिळेल, १ रुपयाच्या पीकविम्याचे पंचनामे कधी होणार, पैसे कधी मिळणार, कर्ज कसं फिटणार. आपण पाहतो की दर वेळेला काहीतरी होतं, तेव्हा अस्मानी नाहीतर सरकारची सुल्तानी शेतकऱ्यावर कोसळते. मधल्या काळात कांद्याने शेतकऱ्याला रडवलं. आता बोगस बियाणांचा फटका पडला आहे, पीक हाताशी येईल असं वाटत असताना वरुणाजाने पाठ फिरवली. आता तरी तो बरसत असला तरी जे नुकसान झालंय ते सरकारने तत्काळ दिलंच पाहिजे.”

हेही वाचा >> “मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने शेतात जातात अन्…”, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “पंचतारांकित शेती…”

हे तिडमागडं सरकार

“काल मी असं ऐकलं की वीमा कंपन्यांना २५ टक्के रक्कम देता येतेय का ते पाहा, असं सरकारने सांगितलं आहे. पण २५ टक्के कुठून काढलंत आपण. १०० टक्के नुकसान झाल्याचं दिसतंय, तिथे पंचनामे कधी करणार? पाऊस लागला तर सरकार म्हणेल की पाऊसच पाऊस चहुकडे. अशा परिस्थितीत सरकार आपल्या दारी आणि दुष्काळ उरावरी अशी परिस्थिती आहे. हे तिडमागडं सरकार आहे. तीन तिघाडा काम बिघाडा सरकार आहे. कार्यक्रम, जाहिराती जोरात करतंय. जाहिरांतीवर पैसे खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे दिले तर बरं होईल”, अशी टीकाही त्यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thackerays attack on the government for crop flight and compensation asmani on farmers or governments sultanate sgk