आक्रमक आणि डॅशिंग अशी प्रतिमा असलेले पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या वडिलांचे निधन झाले आहे असे समजते आहे. नारायणराव नांगरे पाटील असे त्यांच्या वडिलांचे नाव होते. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. कोल्हापूर येथील खासगी रूग्णालयात नारायणराव नांगरे पाटील यांनी अखेरचा श्वास घेतला.
नारायणराव नांगरे पाटील हे मूळ कोकरूड गावाचे रहिवासी होते. हे गाव सांगलीतील शिराळा तालुक्यात आहे. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी कोकरूड गावाचे सरपंच ते शिराळा पंचायत समितीचे उपसभापती या पदापर्यंत विविध पदं भुषवली आहेत. जुन्या पिढीतील पैलवान अशीही त्यांची ओळख आहे. नारायणराव नांगरे पाटील यांच्या पार्थिवावर कोकरूड या त्यांच्या मूळ गावीच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विश्वास नांगरे पाटील यांच्यावर त्यांच्या वडिलांच्या व्यक्तिमत्त्वाचा मोठा प्रभाव होता.