अभिनेता आर्य बब्बर सोमवारी (२२ फेब्रुवारी) त्याची प्रेयसी जास्मिन पुरी हिच्यासह विवाहबंधनात अडकला. या दोघांची ओळख कामाच्या निमित्ताने झाली होती. तेव्हापासून हे दोघे एकमेकांना डेट करत होते.
आर्यने काही पंजाबी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले असून सध्या तो एक टीव्ही मालिका करत आहे. तर जास्मिन ही निर्मिती कंपनीमध्ये काम करते. कामाच्या निमित्ताने या दोघांची ओळख झाली आणि गेले दोन वर्ष हे दोघे एकमेकांना डेट करत होते. आर्य हा राज बब्बर यांचा मोठा मुलगा आहे.
लग्नानंतर आर्य बब्बरने त्याच्या पत्नीसोबतचा फोटो ट्विट केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aarya babbar marries girlfriend jasmine puri see photo of the newlyweds