‘बिग बॉस मराठी’ हा कार्यक्रम कायमच चर्चेत असतो. या कार्यक्रमातील अनेक कलाकार आजही काही ना काही कारणांमुळे प्रसिद्धीझोतात असतात. मराठी अभिनेत्री आणि नृत्यांगणा म्हणून सुरेखा कुडची यांना ओळखले जाते. सुरेख यांचा प्रवास लावणी आणि तमाशाच्या फडातून सुरु झाला. लावणीतील त्यांच्या नृत्यअदाकारीवर सर्वजण फिदा आहेत. सुरेखा कुडची यांनी नुकतंच त्यांच्या एका चाहत्याची आठवण सांगितली आहे. त्यांचा हा अनुभव फारच बोलका आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुरेखा कुडची यांनी नुकतंच पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावात भरलेल्या तमाशा महोत्सवात सांगितला. यावेळी त्यांनी ‘घुंगरांच्या तालावर’ या ‘न्यूज 18 लोकमत’च्या एका कार्यक्रमात लावणीतील कार्यक्रमाबद्दलचा अनुभव सांगितला.
आणखी वाचा : “मी असहय्य…” ‘प्लाझा’, ‘मुक्ता’सारख्या दक्षिण मुंबईतल्या चित्रपटगृहात मराठी चित्रपटाला शो मिळेना, अभिषेक देशमुख संतापला

यावेळी सुरेखा कुडची म्हणाल्या, “नृत्य हे माझ्यासाठी संजीवनी आहे. मी कशी नाचते याची मला कल्पना नाही. पण मी जे काही करते ते लोकांना आवडतं हे मला माहिती आहे. मला अजूनही माझ्या अनेक चाहत्यांच्या आठवणी लक्षात आहेत. माझ्या इतक्या वर्षातील लावणीच्या प्रवासातील एक आठवण मी तुम्हाला सांगू इच्छितो.”

“त्यावेळी सांगलीमध्ये मी महिन्याला लावणीचे १४-१५ शो करायचे. तिथे माझा एक प्रेक्षक होता. माझ्या प्रत्येक शोला तो यायचा. तो त्या एकाच सीटवर बसलेला असायचा. कार्यक्रम संपल्यावर तो माझ्यासाठी द्राक्षाचा बॉक्स घेऊन यायचा. त्याने कधीही मला वाईट नजरेनं पाहिलं नाही. तो कधीच माझ्याशा बोलायला आला नाही. तो मला भेटण्यासाठीही कधी आला नाही.” असंही त्यांनी म्हटले.

आणखी वाचा : “माझ्यावर बायोपिक आला तर…” राज ठाकरेंच्या उत्तरावर तेजस्विनी पंडितला हसू आवरेना

“पण तो माझ्या मॅनेजरकडे दर कार्यक्रमानंतर द्राक्षाचा बॉक्स देऊन यायचा आणि म्हणायचा, हे मॅडम ना द्या. असं एकदा झालं, दोनदा झालं पण ४-५ वेळा झालं. त्यानंतर मला राहवलं नाही आणि मी म्हणाली, कोण आहे हा व्यक्ती? मला त्याला भेटायचं आहे. मी त्याला भेटले आणि त्यावेळी त्याला द्राक्षाचा बॉक्स का द्यायचा याबद्दल विचारले. तुम्ही सारखं सारखं असं का करत आहात? असे मी त्याला म्हटलले. त्यावर तो म्हणाला, “मॅडम तुम्हाला नाही कळायचं काय ते.” त्याचं ते वाक्य ऐकून मी गप्प बसले. मी काहीच बोलले नाही आणि तिथून निघून गेले” असे सुरेखा कुडचींनी सांगितले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress surekha kudachi share special fan movement during lavani program nrp