हॉलिवूडमधील लक्षवेधी जोडप्यांपैका एक जोडी म्हणजे अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट. हे दोघं कुठेही गेले तरी प्रसारमाध्यमांच्या नजरा कायम त्यांच्यावर असतात. अशा या गोड जोडप्याने जेव्हा विभक्त होण्याचा निर्णय घेतला तेव्हा मात्र अनेकांनाच वाईट वाटले होते. या दोघांच्या
घटस्फोटाच्या बातमीमुळे गेल्या वर्ष भरापासून त्यांचा चाहतावर्ग नाराज होता. मात्र अँजेलिनाने त्यांच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आणली आहे ती म्हणजे स्वतः अँजेलिनाने आता घटस्फोट न करण्याचा निर्णय घेतला आहे. यूएस विकलीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार आता हे दोघं पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. अँजेलिनाने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.
‘बिग बॉस’ फेम स्वामी ओम यांना अटक
लॉस अँजेलिसला जाताना विमानात मद्यपानानंतर ब्रॅड आणि त्याचा मुलगा मॅडॉक्समध्ये वाद झाला होता. ब्रॅडच्या मद्यपानाच्या व्यसनाला त्रस्त झालेल्या अँजेलिनाने या घटनेनंतर थेट विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. एवढेच नाही तर तिने सहा मुलांचा ताबाही स्वतःकडेच घेतला होता.
या घटस्फोटाचा दोघांवरही फार परिणाम झाल्यामुळे दोघांनीही यावर विचार करण्याचा निर्णय घेतला. अखेरीस ब्रॅडने उपचार घेऊन मद्यपानाच्या विळख्यातून सुटका करुन घेतली आणि अँजेलिनाने आपल्या सहा मुलांच्या भविष्यासाठी घटस्फोटाचा अर्ज मागे घेतला. ब्रॅड-अँजेलिना यांना मॅडॉक्स (१५), पॅक्स (१३), जाहरा (१२) शिलॉ (११) आणि ९ वर्षांची विविअन आणि नॉक्स ही जुळी मुलं आहेत.
नागराजने बिग बींसाठी खास हिंदीमध्ये लिहिली फेसबुक पोस्ट
गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या घटस्फोटाचे प्रकरण पुढे सरकत नव्हते. त्यामुळे हे जोडपे विभक्त होणार की नाही याबद्दल काही सांगता येत नव्हते. पण आता त्यांच्या निकटवर्तीयांनी ते घटस्फोट घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या अँजेलिनाचं प्रेम पुन्हा जिंकण्यासाठी ब्रॅड अथक मेहनत घेत असल्याचे सांगितले जात आहे.