अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या ‘काबिल’ या चित्रपटातील ‘हसीनो का दीवाना’ या गाण्यामुळे चर्चेत आली आहे. अमिताभ बच्चन यांच्या ‘याराना’ या चित्रपटातील गाण्याचा नवा अंदाज ‘काबिल’मधील ‘हसीनो का दिवाना’ या चित्रपटातून पाहायला मिळत आहे. अभिनेत्री उर्वशी रौतेला या गाण्यामध्ये थिरकत असल्यामुळे तिने अनेकांनाच तिच्या अदांनी घायाळ केले आहे. उर्वशीच्या या गाण्यातील परफॉर्मन्सबद्दल बिग बी अमिताभ बच्चन यांनीही तिची प्रशंसा केली आहे. एका कार्यक्रमादरम्यान उर्वशी रौतेला आणि आमिताभ बच्चन यांची भेट झाली असता त्यांनी उर्वशीची प्रशंसा केली.
चित्रपटसृष्टीमध्ये येणाऱ्या नवोदितांचे आणि एखाद्या नव्या प्रयोगाचे स्वागत करणाऱ्या कलाकारांमध्ये बिग बी नेहमीच पुढे असतात. त्यामुळे बिग बींनी उर्वशीचे कौतुक केल्यामुळे तिचाही आनंद गगनात मावेनासा झाला असणार यात शंकाच नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘उर्वशी अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी उत्सुक होती. तिने हे खास गाणे त्यांनाच समर्पित केले आहे. उर्वशीसाठी हा एक खास क्षण होता. अमिताभ बच्चन यांनी या गाण्यासाठी उर्वशीचे खूप कौतुक केले आणि सोबतच त्यांनी या गाण्याच्या नव्या वर्जनचीही प्रशंसा केली आहे’. यावेळी अमिताभ बच्चन यांनी उर्वशीसोबत चित्रपटात काम करण्याची इच्छाही व्यक्त केली, अशी माहितीसुद्धा सूत्रांनी दिली. ‘थिंक विथ मी समिट २०१६’ या क्रार्यक्रमादरम्यान उर्वशी आणि अभिताभ बच्चन यांची भेट झाली होती. या कार्यक्रमामध्ये उर्वशीला ‘युथ आयकॉन इंडिया’ या पुरस्कारानेही गौरविण्यात आले.
पाहा: Video : ‘काबिल’मधील ‘सारा जमाना…’ गाण्याचा टीझर प्रदर्शित, पाहा उर्वशीची आकर्षक अदाकारी!
दरम्यान, शेकडो लाईट असलेला पोशाख परिधान करून बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी ‘सारा जमाना…’ हे गाणे ‘काबिल’ चित्रपटाच्या निमित्ताने हे गाणे पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर अनुभवता येणार आहे. उर्वशी रौतेला या गाण्यावर थिरकली असल्याने ते अधिकच ‘पेपी’ आणि ‘सिझलिंग’ झाले आहे. नुकतीच या गाण्याची एक झलक प्रदर्शित करण्यात आली. ‘ग्रेट ग्रॅण्ड मस्ती’ चित्रपटातील अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या याआधी प्रदर्शित झालेल्या ‘गल बन गयी’ या संगीत व्हिडिओला देखील युट्यूबवर चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. ‘ग्रेट ग्रॅण्ड मस्ती’ चित्रपटातील गाणी आणि ‘गल बन गयी’ गाण्यातून उर्वशीने तिचे नृत्यकौशल्य सिद्ध केले आहे. आमच्या चित्रपटात हे गाणे महिला पार्श्वगायिकेने गायल्याचे गाण्याविषयी अधिक माहिती देताना एका मुलाखतीदरम्यान ‘काबिल’चे दिग्दर्शक संजय गुप्ता म्हणाले होते. त्याचप्रमाणे उर्वशीवर चित्रीत करण्यात आलेले हे गाणे अतिशय दिमाखदार झाल्याचे देखील त्यांनी सांगितले होते. मुळ गाण्याचा उल्लेख होताच अमिताभ बच्चन यांनी परिधान केलेल्या दिव्यांच्या पोशाखाची आठवण होते. आजही हे गाणे पाहताना अनेकांचे डोळे आश्चर्याने विस्फारतात.