प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी ‘बिग बॉस’चा १५वा सिझन सज्ज झाला आहे. काल रात्री ९.३० च्या दरम्यान या शो चा प्रीमियर पार पडला. ‘बिग बॉस’च्या जुन्या पर्वातील अभिनेत्री देवोलीना आणि आरती सिंहने हा खास सोहळा होस्ट करत ‘बिग बॉस’च्या १५व्या सिझनमधील स्पर्धकांची नाव जाहीर केली आहेत. बिग बॉसच्या १५ व्या पर्वात नेमकं कोण कोण सहभागी झालं आहे? याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.
‘बिग बॉस १५’ च्या या शो चा पहिला स्पर्धक अभिनेता जय भानुशाली ठरला. जयने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. त्यासोबतच अनेक शो ही होस्ट केले आहेत. त्यानंतर दुसरा स्पर्धक विशाल कोटियन यानेही बिग बॉसच्या घरात एंट्री घेतली. विशालने ‘अकबर का बल बिरबल’ यासारख्या अनेक मालिकेत काम केले आहे.
‘बिग बॉस १५’ ची तिसरी स्पर्धक तेजस्वी प्रकाश ठरली. तेजस्वीने काही महिन्यांपूर्वी ‘खतरो के खिलाडी १०’ या रिअॅलिटी शो मध्ये भाग घेतला होता. त्यानंतर बिग बॉस १५ च्या घरात जाणारी चौथी स्पर्धक विधी पंड्या ठरली. तिने ‘उडान’, ‘एक-दूजे के वास्ते’ या मालिकेत उत्तम भूमिका साकारली आहे.
त्यासोबत अभिनेता सिम्बा नागपालही या स्पर्धेत सहभागी झाला. सिम्बाने ‘स्पिल्ट्सविला’ आणि ‘शक्ति: अस्तित्व के एहसास’ या मालिकांत काम केले आहे. ‘बिग बॉस 13’ चा उपविजेता असीम रियाजचा भाऊ उमर रियाज देखील ‘बिग बॉस 15’ च्या घरात सहभागी झाला आहे. उमर हा व्यवसायाने एक डॉक्टर आहे. तो अनेकदा विविध गाण्यांच्या व्हिडीओच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतो.
‘खींच मेरी फोटो’ आणि ‘नागिन गिन गिन’ सारखी सुपरहिट गाणी गायलेली गायिका अक्सा सिंह देखील ‘बिग बॉस 15’ मध्ये सहभाग झाली. त्यासोबतच पंजाबी गायिका आणि अभिनेत्री अफसाना खान, डोनल बिष्ट, मीशा अय्यर, साहिल श्रॉफ, ईशान सहगल हे कलाकारही यंदा बिग बॉसच्या घरात दिसणार आहे. टेलिव्हिजनवरील हॅण्डसम हंक करण कुंद्रा ‘बिग बॉस १५’मध्ये सहभागी झाला आहे.
कधी, कुठे पाहता येणार?
काल २ ऑक्टोबरला रात्री साडे नऊ वाजता ‘बिग बॉस १५’चा प्रिमियर पार पडला. त्यानंतर आता उद्या ४ ऑक्टोबरपासून रात्री १०.३० वाजता कलर्सवर ‘बिग बॉस १५’चा प्रसारित होणार आहे. तर प्रत्येक विकेण्डचा ‘शनिवार का वार’ आणि ‘संडे का वार’ हे खास एपिसोड रात्री नऊ वाजता टेलिकास्ट होतील. या खास भागात सलमान खान स्पर्धकांची शाळा घेताना दिसेल.
यंदा ‘बिग बॉस’चा शो आणखीच खास असणार आहे. यंदाची थीम जंगलावर आधारित असल्याने जंगलातील घरातच स्पर्धकांना राहवं लागेल. त्यामुळे स्पर्धकांपुढे अनेक नवी आव्हानं असतील. मध्य प्रदेशातील पेंच नॅशनल पार्कमध्ये हा शो शूट केला जाणार आहे.