अभिनेत्री रिया सेन लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचं वृत्त ‘मिड डे’ने प्रसिद्ध केलं आहे. रिया सध्या ‘रागिनी एमएमएस’ या चित्रपटावर आधारित एका वेब सीरिजच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. एकता कपूरच्या या प्रोजेक्टमध्ये व्यग्र असलेली रिया तिच्या प्रेमप्रकरणामुळे चर्चेत आली. शिवम तिवारी या फोटोग्राफरसोबतच्या बऱ्याच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर आता रियाने लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रियाच्या प्रियकराविषयी फार काही माहिती मिळू शकली नसली तरीही तिच्या इन्स्टाग्राम फोटोमध्ये त्याची झलक पाहायला मिळत आहे. शिवमसोबतच्या प्रत्येक फोटोमध्ये या दोघांचीही केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. अॅमस्टरडॅम, स्लोव्हाकिया, थायलंड अशा विविध ठिकाणी रिया आणि शिवम भटकंती करतानाचे फोटोही सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.

दरम्यान, रियाची आई आणि अभिनेत्री मून मून सेन यांच्या वक्तव्यानुसार आपला साथीदार दिसायला चांगला असावा यासाठी रिया आग्रही आहे. पैशाला रिया आणि तिची बहिण फारसं महत्त्वं देत नाहीत. पण, माझ्या दोन्ही मुलींचं संगोपन राजेशाही थाटात झालं आहे. त्यामुळे त्याच तोडीचा मुलगा त्यांचा जोडीदार हवा असं त्या म्हणाल्या होत्या. तेव्हा आता जर, रियाच्या लग्नाच्या चर्चा खऱ्या असतील तर तिच्या होणाऱ्या जोडीदाराविषयी जाणून घ्यायला कोणाला आवडणार नाही?

‘स्टाईल’ या चित्रपटामुळे नावारुपास आलेल्या रिया सेनला चित्रपटसृष्टीत फारसं यश मिळालं नाही. बॉलिवूड व्यतिरीक्त रियाने बंगाली, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि इंग्रजी भाषिक चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ‘गरबा, दांडिया क्वीन’ फाल्गुनी पाठकच्या ‘याद पिया की आने लगी’ या म्युझिक व्हिडिओने रिया प्रसिद्धीस आली होती. लॅक्मे, निरमा लाइम फ्रेश सोप, किओ कार्पिन बॉडी ऑइल, क्लोज अप टूथपेस्ट, लिमका, कोलगेट, रिलायन्स आणि अन्य काही प्रॉडक्सच्या जाहिरातींमध्येही झळकली होती.

वाचा : …म्हणून ऋषी कपूर यांना मारण्यासाठी गेला होता संजय दत्त

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress riya sen is all set to marry her long time boyfriend very soon says reports