बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असतात. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाला लवकरच ५० वर्ष पूर्ण होणार आहेत. त्याआधी अलिकडेच नात नव्या नवेली नंदा हिच्या ‘व्हॉट द हेल नव्या’ या पॉडकास्टमध्ये जया बच्चन यांनी लग्न आणि वैवाहिक आयुष्यावर भाष्य केलं. नव्याच्या पॉडकास्टचा विषय ‘मॉडर्न लव्ह : रोमान्स अँड रिग्रेट्स’ असा होता. या विषयावर बोलताना जया बच्चन यांनी त्यांच्या स्वतःच्या लग्नाबाबत बरेच खुलासे केले. यावेळी त्यांनी त्यांच्या लग्नाआधीचा एक किस्साही सांगितला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्या पॉडकास्टमध्ये नव्याने आजी जया बच्चन यांना त्यांच्या लव्हस्टोरीबाबत विचारलं. त्यावेळी जया बच्चन यांनी लग्नाआधी अमिताभ बच्चन यांनी कशाप्रकारे जया यांच्यासमोर एक अट ठेवली होती याचा किस्सा शेअर केला. त्या म्हणाल्या, “आम्ही ठरवलं होतं की ऑक्टोबरमध्ये लग्न करायचं. कारण त्यानंतर माझं काम कमी होणार होतं. त्यानंतर माझ्याकडे फार प्रोजेक्ट नव्हते. पण अमिताभ मला म्हणाले, मला ९ ते ५ काम करणारी बायको अजिबात नकोय. तू काम कर, पण रोज नाही. तू तुझे प्रोजेक्ट निवड आणि चांगल्या लोकांबरोबर काम कर.”

आणखी वाचा- ‘केबीसी’च्या मंचावर अमिताभ बच्चन यांनी सांगितला शाळेमधला किस्सा; म्हणाले, “दरी ओलांडून…”

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी ३ जून १९७३ रोजी सप्तपदी घेतली होती. ही जोडी २०२३ मध्ये त्यांच्या लग्नाचा ५० वा वाढदिवस साजरा करणार आहे. अमिताभ आणि जया यांचं लग्न फार साध्या पद्धतीने आणि मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये पार पडलं होतं. या लग्नाबाबत मीडियाला कोणतीच माहिती देण्यात आली नव्हती.

आणखी वाचा- अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर फोटोग्राफर्स आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झाली धक्काबुक्की, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान लग्नानंतही जया बच्चन यांचं करिअर बहरत गेलं. पण पुढे जया यांनी कुटुंबाला प्राधान्य देत करिअर काही काळासाठी मागे ठेवलं. याबद्दल अमिताभ बच्चन यांनी ‘इंडिया टुडे’ला २०१४ मध्ये दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं. ते म्हणाले होते, “मला जयाबद्दल एक गोष्ट नेहमीच कौतुकास्पद वाटते ती म्हणजे तिने करिअर नाही तर कुटुंबाला नेहमीच जास्त प्राधान्य दिलं. अर्थात माझ्याकडून करिअर आडकाठी कधीच नव्हती मात्र हा तिचा निर्णय होता. वैवाहीक जीवनात सगळेच निर्णय बायको घेत असते.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan had condition before marrying jaya bachchan know what it is mrj