urfi javed latest video user comment why do why are you not colliding with salman car | "सलमानच्या गाडीला..." अतरंगी ड्रेसमुळे धडपडणाऱ्या उर्फीला पाहून नेटकऱ्याची कमेंट | Loksatta

“सलमानच्या गाडीला…” अतरंगी ड्रेसमुळे धडपडणाऱ्या उर्फीला पाहून नेटकऱ्याची कमेंट

उर्फीचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यावर एका युजरने सलमान खानचा उल्लेख करत भन्नाट कमेंट केली आहे

“सलमानच्या गाडीला…” अतरंगी ड्रेसमुळे धडपडणाऱ्या उर्फीला पाहून नेटकऱ्याची कमेंट
उर्फीचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. अंतरंगी फॅशनमुळे अनेकदा तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं पण यामुळे अर्थातच उर्फीला काहीच फरक पडत नाही. ती रोज कोणत्या ना कोणत्या नव्या अवतारात चाहत्यांसमोर येते. काही दिवासांपूर्वीच सनी लिओनीशी तुलना झाल्याने ती बरीच चर्चेत आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा उर्फीचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यावर एका युजरने सलमान खानचा उल्लेख करत भन्नाट कमेंट केली आहे.

सोशल मीडियावर सध्या उर्फीचा लेटेस्ट व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात ती काळ्या रंगाच्या आउटफिट्समध्ये दिसत आहे. अर्थातच नेहमीप्रमाणे उर्फीचा हा ड्रेसही युनिक आणि अतरंगी आहे. विशेष म्हणजे या ड्रेसमुळे तिचा वारंवार तोल जात असून ती या व्हिडीओमध्ये ड्रेसमुळे धडपडताना आणि लोकांवर आदळताना दिसत आहे. तिची ही अवस्था पाहून एका नेटकऱ्याला चक्क सलमान खानची आठवण झाली आहे.

आणखी वाचा- सनी लिओनीने कपड्यांबाबत वक्तव्य केल्यानंतर उर्फी जावेदचं उत्तर, म्हणाली “तू माझ्या कपड्यांबरोबर…”

उर्फी जावेदच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. काहींनी तिच्या आत्मविश्वासाचं कौतुक केलं आहे. तर अनेकांनी तिला अशाप्रकारे अतरंगी कपडे घातल्यामुळे ट्रोल केलं आहे. अशातच एका युजरने कमेंट करताना लिहिलं, “सगळ्यांवर आदळते आहेस तर मग सलमान खानच्या गाडीला जाऊन का आदळत नाहीयेस तू?” याशिवाय आणखी काही युजर्सनी कमेंट्समध्ये, “पुढच्या वेळी चष्मा लावून ये.”, “ही पडली कशी नाही” असंही म्हटलं आहे.

दरम्यान उर्फी एमटीव्हीवरील ‘स्प्लिट्सव्हिला’ या रिएलिटी शोमध्ये सहभागी झाली आहे. या शोचे सूत्रसंचालन बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी व अर्जुन बिजलानी करत आहेत. विचित्र कपड्यांमुळे लक्ष वेधून घेणाऱ्या उर्फीच्या कपड्यांची भूरळ बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीलाही पडली होती आणि शोमध्ये सनीने उर्फीच्या हटके कपड्यांचं कौतुक केलं होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 20:29 IST
Next Story
विवेक अग्निहोत्रींनी खरेदी केला तब्बल १८ कोटींचा आलिशान फ्लॅट? ट्वीट करत म्हणाले “काँग्रेस, आप आणि बेरोजगार…”