श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरसाठी आजचा दिवस खऱ्या अर्थानं खास होता. जान्हवीच्या पहिल्या वहिल्या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. गेल्या वर्षभरापासून जान्हवी या चित्रपटासाठी मेहनत घेत होती. इतकंच नाही तर खुद्द श्रीदेवी यांनीही जान्हवीला अभिनयाचे धडे दिले होते. त्यामुळे मुलीला छोट्या पडद्यावर पाहणं हे श्रीदेवी यांचं स्वप्न होतं, पण श्रीदेवी यांचं निधन झालं अन् जान्हवी मात्र पुरती कोलमडली. याकाळात बहीण खुशी जान्हवीच्या पाठी खंबीरपणे उभी राहिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Dhadak Movie Trailer Launch: हिंदी ‘झिंगाट’सह ‘धडक’ले जान्हवी- इशान

‘धडक’च्या ट्रेलर प्रदर्शनासाठी खुशीही उपस्थित होती. जान्हवीचं अभिनेत्री होण्याचं स्वप्न अखेर साकार झाल्याचं पाहून खुशीलाही अश्रू अनावर झाले. ‘धडक’चा ट्रेलर पाहून खुशी भावूक झाली. हे क्षण उपस्थितांच्या नजरेतूनही सुटले नाही. धडकचा ट्रेलर लाँच सोहळ्यासाठी संपूर्ण कपूर कुटुंब उपस्थित होतं. ट्रेलरमधली जान्हवीच्या अभिनयाची झलक पाहून सगळ्यांनीच तिच्या अभिनयाचं कौतुक केलं.

Janhvi kapoor Interview for Vogue magazine : जान्हवी कपूरविषयीच्या ‘या’ खास गोष्टी माहिती आहेत?

श्रीदेवी यांच्या निधनानंतर खुशी आणि जान्हवी एकमेकांच्या खूपच जवळ आले. जान्हवीला श्रीदेवी यांची कमी भासू नये याची पुरेपुरे काळजी गेल्या काही दिवसांत खुशीनं घेतली. पण आज मात्र श्रीदेवी यांची कमी दोघांनाही प्रकर्षानं जाणवली त्यामुळे आईच्या आठवणीनं जान्हवी- खुशी पुन्हा एकदा भावूक झाल्या.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhadak trailer launch khushi kapoor breaks down into tears