दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष आणि काजोल यांच्या ‘व्हीआयपी २’ सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. वेलैला पट्टधारी या सिनेमाचा ‘व्हीआयपी २’ हा सिक्वल आहे. खुद्द बॉलिवूडच्या महानायकाने म्हणजे अमिताभ बच्चन यांनी या सिनेमाचा टीझर त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या सिनेमासाठी धनुष फार उत्साहित आहे. त्याने ट्विट करत म्हटले की हा सिनेमा वेलैला पट्टधारीचा सिक्वल आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलका कुबल- आठल्येंच्या मुलीची गगन भरारी

या टीझरमध्ये काजोल कुठेच दिसत नाही. काजोल साधारणपणे २० वर्षांनंतर तामिळ सिनेमात काम करत आहे. ती या सिनेमात खलनायिकेची भूमिका साकारत आहे. गुप्त सिनेमातही तिने नकारात्मक भूमिका साकारली होती. असं म्हटलं जातं की या सिनेमासाठी काजोलची एण्ट्री फार ग्रॅण्ड ठेवण्यात आली आहे. म्हणूनच सिनेमाच्या टीझरमध्ये तिचा समावेश करण्यात आला नाही. पण टीझरमध्ये धनुषचा दमदार लूक अनेकांची मनं जिंकून घेतो. यात तो अॅक्शन हिरो दाखवण्यात आला आहे.

धनुष या सिनेमान रघुवरनही व्यक्तिरेखा साकारत आहे. सिनेमाच्या पहिल्या भागात असे दाखवण्यात आले होते की, रघुवरनला आपली स्वप्न पूर्ण करायची असतात. पण यादरम्यान त्याला नोकरीसाठीही अनेक ऑफर्सही येतात. मात्र तरीही तो आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी सगळ्या नोकऱ्या धुडकावून लावतो. सिनेमाच्या शेवटच्या भागात अखेर धनुष आपलं स्वप्न पूर्ण करतो असे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे सिनेमाच्या दुसऱ्या भागात रघुवरनच्या आयुष्यातील पुढील वाटचाल दाखवण्यात येणार आहे. धनुषसह या सिनेमात काजोलचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
व्हीआयपी २ सिनेमात अनेक बदल करण्यात आले आहेत. पहिला सिनेमा वेलराज यांनी दिग्दर्शित केला होता तर सिक्वलचे दिग्दर्श सौंदर्या रजनीकांत हिने केले आहे. २८ जुलैला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhanush and kajol velaiilla pattadhari 2 vip 2 teaser release