बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ अखेर लग्न बंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नातील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालू असून चर्चेत आहेत. गेल्या जवळपास एक महिन्यापासून त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु होती. सोशल मीडियावर लग्नातील फोटो शेअर करत त्यांनी लग्न झाल्याचे सांगितले आहे. एकंदरीत विकी आणि कतरिनाने मोठ्या झगमगाटात लग्न केल्याचे दिसत आहे. दरम्यान, कतरिनाच्या साखरपुड्याच्या अंगठीची जोरदार चर्चा रंगली आहे. या हिऱ्याच्या अंगठीची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विकी कौशलने कतरिनाला साखरपुड्याला हिऱ्याची अंगठी घातली आहे. ही हिऱ्यांची अंगठी ‘टिफनी अँड कंपनी’ची आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सुंदर अंगठीची किंमत ९८०० डॉलर, म्हणजे भारतीय चलनानुसार ७ लाख ४० हजार रुपये आहे. इतकच काय तर कतरिनाचे मंगळसूत्र देखील अतिशय सुंदर आहे.
आणखी वाचा : विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नावर कंगनाची प्रतिक्रिया, म्हणाली…

कतरिनाने विकीला प्लॅटिनमची अंगठी घातली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही अंगठी देखील महाग आहे. सध्या सोशल मीडियावर कतरिना आणि विकीच्या लग्नाच्या जोरदार चर्चा सुरु आहेत.

राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट येथे कतरिना आणि विकीच्या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी अनेक लहान मोठ्या कलाकारांनी हजेरी लावली. काल त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. अत्यंत गुप्त पद्धतीने, कोणतीही गोष्ट जाहीर न करता, अगदी कडक नियम पाळून हा विवाहसोहळा पार पडला. पंजाबी पद्धतीने हा विवाह पार पडल्याचं वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे. पाच मजल्यांचा केक एका इटालियन शेफकडून बनवून घेण्यात आला असून भारतीय आणि पाश्चिमात्य अशा दोन्ही पद्धतींचे स्वादिष्ट पदार्थ पाहुण्यांसाठी ठेवण्यात आले आहेत. या दोघांच्याही चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसून येत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Did you know katrina kaif and vicky kaushal engagement ring price avb