देवदत्त नागे, श्वेता शिंदे आणि रोहिणी हट्टंगडी अशा दिग्गज कलाकारांचे, ‘झी युवा’ वाहिनीवरील ‘डॉक्टर डॉन’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन झाले. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. डॉक्टर डॉनने टेलिव्हिजनवर अक्षरशः धुमाकूळ घालत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्यास सुरुवात केली. मालिकेचा वेगळा विषय, डॉक्टर डॉन आणि त्याच्या पंटर मंडळींचा जलवा यासगळ्या गोष्टी प्रेक्षकांच्या लाडक्या ठरल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या मालिकेच्या लोकप्रियतेमुळे नुकतंच या मालिकेने २०० भागांचा टप्पा गाठला आहे. प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंब्यामुळे या मालिकेने हा यशस्वी माईलस्टोन गाठला असं मालिकेचा प्रमुख अभिनेता देवदत्त नागे याचं म्हणणं आहे. सेटवर केक कापून हा आनंद साजरा करण्यात आला.

आणखी वाचा- म्हणून ट्रेडमिलवर अक्षय कुमार चालला चक्क २१ किमी? जाणून घ्या कारण

या आनंदाच्या क्षणी देवा म्हणजे अभिनेता देवदत्त नागे म्हणाला, “डॉक्टर डॉन या मालिकेला जवळपास १ वर्ष पूर्ण झालंय आणि मालिकेने २०० भागांचा टप्पा देखील गाठला. हे सगळं रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे शक्य झालं आहे. या मालिकेच्या संपूर्ण टीमचे आणि प्रेक्षकांचे मी खूप खूप आभार मानतो. प्रेक्षक वेळात वेळ काढून आम्हाला रोज टीव्ही स्क्रीनवर बघतात आणि आमच्यावर खूप प्रेम करतात. आम्ही कलाकार टीव्हीवर दिसतो पण प्रत्येक भाग तुमच्यासमोर सादर करण्यासाठी पडद्यामागे खूप मोठी टीम कार्यरत आहे या संपूर्ण टीमचे देखील मी अभिनंदन करतो. प्रेक्षक या पुढेही आमच्यावर असाच प्रेम करत राहतील याची मला खात्री आहे.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Doctor don serial completed 200 episodes avb