आपल्या लाडक्या सेलिब्रिटीची एक झलक पाहण्यासाठी, त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी चाहते काय करतील याचा नेम नाही. त्यातही जर तो सेलिब्रिटी बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात सलमान खान असल्यास सेल्फी काढायला मोह कोणाला आवरणार नाही? अशाच एका चाहतीने फोटो काढण्यासाठी सलमानचा हात खेचला आणि त्यानंतर ‘दबंग’ खानचा चेहरा अक्षरश: पाहण्यासारखा होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘हम आप के है कौन’ या चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने चित्रपटातील कलाकार मुंबईतील लिबर्टी थिएटरमध्ये जमले होते. या चित्रपटाचा स्पेशल शो या थिएटरमध्ये होणार होता. यावेळी कलाकारांना पाहण्यासाठीही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. या गर्दीतून पुढे जात असतानाच अचानक एका तरुणीने सलमानचा हात खेचला. चाहतीच्या या अनपेक्षित वागण्याने सलमानचा पारा चढला. अर्थात राग अनावर होऊनही तो संयमाने वागला आणि पुढे निघून गेला. सलमानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनीही चाहतीच्या अशा वागण्यावर संताप व्यक्त केला.

‘हम आप के है कौन’ला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रेणुका शहाणे, आशुतोष राणा, माधुरी दीक्षित, अँड्रे बहल हे कलाकार एकत्र जमले होते. सूरज बडज्याच्या दिग्दर्शित या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आज २५ वर्षांनंतरही या चित्रपटाची क्रेझ कायम आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Female fan pulled salman khan hand to take photos angry salman watch video ssv